अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याऱ्यानां फाशीची शिक्षा द्यावी- भा. सं. ची मागणी भारतीय क्रांतिकारी संघटनेच्या शिष्टमंडळाने नागभिड पोलीस निरीक्षकांना दिले निवेदन

 

जय रामटेके /तालुका प्रतिनिधी

नागभीड : तालुक्यातील कसर्ला येथील एका अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी मंगेश दिवाकर मगरे व अजय मुर्लीधर नन्नावरे या नराधमांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी सातत्याने भारतीय क्रांतिकारी संघटना करित आहेत.
आज कसर्ला प्रकरणातील मुख्य आरोपींना फाशीची शिक्षा होईलच यासाठी कठोर गुन्ह्याची नोंद करून पिडीतेच्या कुंटूबियानां न्याय मिळवून द्यावा अशी मागणी भारतीय क्रांतिकारी संघटना नागभीड च्या वतीने निवेदनाद्वारे केली. जेणेकरून विकृत नराधम कुण्या मुलीवर वाकड्या नजरेने बघणार नाही.
या संदर्भात भारतीय क्रांतिकारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डार्विन कोब्रा व संघटनेचे उपाध्यक्ष टेरेन्स कोब्रा यानी पोलीस निरीक्षक याचेशीं चर्चा केल्यानंतर पो. नि. यानीं आरोपींवर कायदेशीर कारवाई करू असे म्हटले. निवेदन देंतानां शहर अध्यक्ष नंदूभाऊ खापर्डे, शहर उपाध्यक्ष विशाल भसारकर, प्रशिल निमगडे, तालुका महासचिव चंद्रशेखर नारायणे, किशोर समर्थ, प्रकाश रडके उपस्थित होते.