भाजप तर्फे १० नवे प्रवक्ते तर ३३ नवे चर्चा पैनालिस्ट म्हणून नियुक्त

215

 

सुनील उत्तमराव साळवे(९६३७६६१३७८)
कार्यकारी संपादक, दखल न्यूज भारत

मुंबई : १७ आँगस्ट २०२०
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात दादा पाटील यांनी आगामी काळासाठी १० नवे प्रवक्ते तसेच ३३ चर्चा पैनालिस्ट ची नियुक्ति केली आहे. केशव उपाध्ये यांची याआधीच मुख्य प्रवक्ता म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.
नव्याने प्रवक्ता म्हणून नियुक्ती करण्यात आलेल्यांमध्ये खा. भारती पवार, आ. गोपीचंद पडळकर, आ. राम कदम, धनंजय महाडिक, एजाज देशमुख , अँड. राहुल नार्वेकर, शिवराय कुळकर्णी, भालचंद्र शिरसाट, राम कुळकर्णी, श्वेता शालिनी यांचा समावेश आहे तर चर्चा पैनालिस्ट म्हणून संपुर्ण महाराष्ट्रातुन एकुण ३३ जणांची नियुक्ती करण्यात आल्याचे भाजपा कार्यालयीन सचीव मुकुंद कुलकर्णी यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.