Home कोरोना  जिल्हयात आज 31 कोरोनामुक्त तर 20 नविन कोरोना बाधित आरमोरी येथील 16...

जिल्हयात आज 31 कोरोनामुक्त तर 20 नविन कोरोना बाधित आरमोरी येथील 16 कोरोना बाधितांचा समावेश, डाँक्टर, नर्स सोबतच पीएसआय पण बाधित

147

 

ऋषी सहारे
कार्यकारी संपादक

गडचिरोली,(जिमाका)दि.17: जिल्हयात आज 31 जण कोरोनामुक्त झाले असून यामध्ये अहेरी येथील एसआरपीएफ हेडरीचे -14, स्थानिक-3, वडसा येथील 12 सीआरपीएफ जवान, धानोरा येथील 1 स्थानिक व मुलचेरा येथील 1 स्थानिक असे एकूण 31 जण कोरोना मुक्त झाले आहेत. त्यांना आज दवाखान्यातून सुट्टी देण्यात आली आहे. तर 20 नविन कोरोना बाधित आढळुन आले आहेत. त्यापैकी 16 आरमोरी येथील असून 2 स्टाफ नर्स, 1 डॉक्टर, 1 पीएसआय, 1 गरोदर महिला असून बाकीचे संस्थात्मक विलगीकरणातील रुग्णांच्या संपर्कात आलेले तीव्र जोखमीचे आहेत. तर 3 कोरोना पॉझिटिव्ह हे कोरचीचे असून 2 मुंबईहुन आलेले तर 1 जण तामिळनाडु येथून आलेला होता. गडचिरोली येथील 1 पोलीस बाधित असून कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेला असून आज एकूण 20 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामुळे जिल्हयातील सक्रिय कोरोना बाधितांची संख्या 140 झाली असून एकुण बाधित संख्या 843 झाली आहे. आत्तापर्यंत एकूण 702 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

Previous articleआधार सेडींग की लोड शेटिंग….? संगणक परिचालकाचा ताण वाढला….. सर्वर काल पासून वेस्त
Next articleभाजप तर्फे १० नवे प्रवक्ते तर ३३ नवे चर्चा पैनालिस्ट म्हणून नियुक्त