आधार सेडींग की लोड शेटिंग….? संगणक परिचालकाचा ताण वाढला….. सर्वर काल पासून वेस्त

155

 

राजेश बालाजीराव नाईक,,
डिस्ट्रिक्ट करसपॉन्डट ,नांदेड
दखल न्यूज // दखल न्यूज भारत

नांदेड :- संपूर्ण देशात प्रधानमंत्री आवास योजना प्रपत्र ड यादीचे आधार लिंकिंग चे काम जोरात सुरू झाले मात्र बरेचदा वेबसाइटवर लोड येत असून गेली दोन दिवसांपासून साईट काम करत नाही. त्यामुळे खेड्या पाड्यातील लोक आपले सरकार केंद्र चालकांकडे अफाट गर्दी करीत असून ऑनलाइन सेवा देण्यासाठी केंद्र चालकांना फार मोठ्या प्रमाणात अडचणीला तोंड द्यावे लागत आहे.

याविषयी वरीष्ठ स्तरावर अधिकार्यंशी या अडचणी सोडविण्यासाठी तक्रारी करुन सुद्धा कुठलेही प्रतिसाद मिळत नसल्याने केंद्र चालक मात्र आडचनीत सापडला आहे.

सोबतच ग्रामीण भागातील वेगवेगळ्या सुविधा पुरविणारे व डिजिटल इंडिया चे स्वप्न पुर्ण करणारे संबंध महाराष्ट्रातील बरेच केेद्रंचालक गेल्या ६ महिन्यापासून तुटपुंज्या मानधनाच्या प्रतिक्षेत आहेत. मात्र याची दखल कोण घेणार हा प्रश्न उपस्थित होत आहे.