आम आदमी पार्टी करणार खड्ड्यात बेशरमचे वृक्षारोपण

 

सुनील उत्तमराव साळवे(९६३७६६१३७८)
कार्यकारी संपादक, दखल न्यूज भारत नागपुर

मौदा / नागपुर:१७ आँगस्ट २०२०
नागपुर जिल्ह्यातील मौदा नगरपंचायत हद्दीतील मौदा ते लापका हा सुमारे 1 किमीचा रस्ता अत्यंत खराब झाला असून नागरिकांना रहदारी करतांना अक्षरशः सर्कस करावी लागते. जून महिन्यात याबाबत बातमी प्रकाशित झाल्यानंतर या रस्त्यावर मोठ्या दगडांचा हार्ड मुरूम टाकून बोळवण करण्यात आली. मात्र पावसामुळे रस्त्याची हालत अत्यंत खराब झाली आहे. मात्र याकडे ना जनप्रतिनिधी ना अधिकारी लक्ष देत आहेत. सार्वजनिक बांधकाम (विशेष प्रकल्प) विभाग व नगरपंचायत यांचे दरम्यान हस्तांतरणावरून या रस्त्याचे घोडे अडले आहे.
नागरीकांना होणारा त्रास पाहता सदर रस्ता लवकरात लवकर दुरूस्त व्हावा अशी आम आदमी पार्टी, तालुका मौदाची मागणी आहे.
शनिवार ता. २२ ऑगस्ट पर्यंत या रस्त्याची दुरूस्ती न झाल्यास रविवार ता. २३ ऑगस्टला आम आदमी पार्टी मौद्याचे वतीने रस्त्यावर बेशरमचे वृक्षारोपण करून शासनाचा व जनप्रतिनिधींचा निषेध नोंदवला जाईल. प्रशासनाकडून याबाबत दखल न घेतल्यास व निषेध नोंदवणे गरजेचे झाल्यास परिसरातील त्रस्त नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पार्टीचे इंजि. राजेंद्र रावते, सहसंयोजक आम आदमी पार्टी, नागपूर जिल्हा (ग्रामीण)यांनी केले आहे.