बिग ब्रेकिंग इंजेवारीचा ग्रामसेवक अखेर निलंबित ; विविध खात्यात केला होता भ्रष्टाचार

195

 

देवानंद जांभुळकर उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली 9373846708

हर्ष साखरे ता प्रतिनिधी आरमोरी

आरमोरी :-

आरमोरी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या इंजेवारी ग्रामपंचायतचे सचिव पि .टी. बन्सोड यांना जिल्हा परिषद गडचिरोली सामान्य प्रशासन विभाग( पंचायत विभाग )यांचे पत्र क्र./ जि प ग / सा प्र वि/ पंचा /स्वा/ 2003/ 2020 अन्वये निलंबित केल्याची घटना नुकतीच पंचायत समिती आरमोरी येथे घडल्याने पंचायत समिती आरमोरी प्रशासनामध्ये खळबळ उडालेली आहे

सविस्तर अशी माहिती आहे की, आरमोरी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत इंजेवारी येथे श्री. पी. टी. बन्सोड ग्रामसेवक म्हणून कार्यरत असताना त्यांनी सन 2017- 18 या वर्षात जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत स्मशानभूमीला संरक्षण भिंत बांधकामांमध्ये रकमेचा अपहार करणे, ग्रामनिधी, ग्रामीण पाणीपुरवठा निधी, 14 वा वित्त आयोग या योजनेचे प्रमाणक उपलब्ध नसणे ,रोकड वहीत रक्कम कोणत्या कामासाठी दिले नमूद न नसणे, साठा रजिस्टर अद्यावत न करणे, 14 वा वित्त आयोग योजनेची डुप्लिकेट रोकड वही तयार करणे ,14 वित्त आयोग रक्कम रोकड वहीत कोणाला दिली याची नोंद न करता रकमेचा अपहार करणे, 14 वा वित्त आयोग अंतर्गत बांधकामाचे अंतिम मूल्यमापन प्रमाणपत्र उपलब्ध नसणे ,कर वसुलीची रक्कम बँकेत जमा न करता परस्पर अफरातफर करणे इत्यादी चौकशी केली असता अंतिम सत्यबाब आढळून आली असल्याने श्री.पी. टी. बन्सोड ग्रामसेवक ग्रामपंचायत इंजेवारी पंचायत समिती आरमोरी यांना महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा( शिस्त व अपील) नियम 1964 मधील 3(1)( अ)नुसार त्यांना निलंबित करण्यात आले .परंतु निलंबित बन्सोड ग्रामसेवक सोबतच तत्कालीन विस्तार अधिकारी रायपुरे यांनी जौजालकर व पोटावी ग्रामसेवक यांचा सुद्धा प्रस्ताव जिल्हा परिषद प्रशासनाला कळविला होता. परंतु श्री बन्सोड यांना निलंबित करण्यात आले. आणि त्या दोन ग्रामसेवकावर काय कारवाई होत आहे याकडे जिल्ह्यातील जनतेचे लक्ष आहे.