कोरोना मुक्ती करिता गायत्री यज्ञ करून संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी

104

 

अकोट शहर प्रतिनिधी
स्वप्नील सरकटे

संत सेना महाराज शैक्षणिक व व सामाजिक संस्था द्वारा महाराष्ट्र नाभिक महामंडळ शाखेच्यावतीने नाभिक समाजाचे धर्मगुरू संत सेना महाराज यांची पुण्यतिथी निमित्त गायत्री यज्ञाचे आयोजन करून देशाला कोरोना संसर्गापासून वाचविण्याकरिता विशेष यज्ञाचे चे आयोजन करण्यात आले.व गायत्री परिवाराने यानिमित्त विशेष आहूत्या टाकून कोरोणा मुक्तीचे साकळे संत सेना महाराज पुण्यतिथीला नाभिक बांधवांनी केले.सर्वप्रथम कार्यकारी मंडळाच्या वतीने शिवाजीनगर येथील संत सेना महाराज मंदिरात श्री. चा अभिषेक अमोल शिगंणारे यांच्या हस्ते विधीवत पूजा करून पंच मंडळाने महाआरती केली. व राधे-राधे नगर येथील संत सेना महाराज सभागृहात पुण्यतिथी निमित्ताने गायत्री यज्ञाचे आयोजन करण्यात आले यज्ञाचे पौरोहित्य दादा भाऊ गावंडे व राजू चोंडेकर यांनी केले याप्रसंगी शिवराज येऊलकर यांचा सत्कार करण्यात आला व समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन संस्थेचे अध्यक्ष संजय भायानी व सचिव नरेंद्र महानकर समवेत पदाधिकाऱ्यांनी केले, लोक डॉउनमुळे समाज बांधवांनी आपल्या घरीच संत सेना महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन केले.