Home यवतमाळ स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या वतीने राजुर व सिंधि...

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन धनोजे कुणबी महिला आघाडीच्या वतीने राजुर व सिंधि वाढोना येथील शाळांना भेटवस्तू

154

 

प्रतिनिधी:रोहन आदेवार

वणी: स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन शनिवारला धनोजे कुणबी महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ वंदना आवारी, उपाध्यक्षा सौ.कविता चटकी, सचिव सौ.साधना मत्ते कोषाध्यक्ष मिनाक्षी देरकर सहसचिव लता वासेकर.ध.कु म आघाडीच्या संस्थापीका सौ.संध्याताई नांदेकर, माजी अध्यक्षा किरणताई देरकर, साधनाताई गौरकार, सौ.अर्चना बोदाडकर, सौ.वृंदा पेचे, सौ.ज्योती सूर, सौ.माया गौरकार, सौ. स्वप्ना पावडे, सौ.संध्या बोबडे यांनी जि.प.व.प्राथ.शाळा सिंधी वाढोणा व जि प.व.प्राथ शाळाराजुर येथे भेट दिली. देशाची भावी पिढी म्हणजे विद्यार्थी यावर लक्ष केंद्रित करुन विद्यार्थ्यांना शैक्षणिक दृष्ट्या उपयोगी पडतील अशी कराओके सांउड सिस्टीम व भेटवस्तू दोन्ही शाळांना भेटवस्तु दिली.

यावेळी अध्यक्षा सौ.वंदना आवारी…यांनी शाळेविषयी .. विद्यार्थ्यांच्या हितासाठी व शाळेसाठी आम्ही यापुढे ही मदत करु गावातील विद्यार्थी घडणे, मोठ्या पदावर जाणे म्हणजे सर्वासाठी एक प्रेरणा असते. अशा शब्दांत मनोगत व्यक्त केले. सौ.संध्या नांदेकर यांनी सुद्धा महिला आघाडीच्या सामाजिक कार्याबद्दल माहिती दिली. व शाळेच्या प्रगती विषयी समाधान व्यक्त केले. सदर कार्यक्रमास शाळा शिक्षण समीतीचे अध्यक्ष दिवाकर महाकुलकर गावचे पोलीस पाटील गानफाडे तसेच तंटा मुक्त समितीचे अध्यक्ष घुगुल शाळेचे मुख्याध्यापक वाटेकर सर तसेच सहाय्यक शिक्षक मुद्द्यमवार सर, नेहा गोखरे मॕडम, हर्षदा चोपने मॕडम व गावातील ज्येष्ठ व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. त्यानंतर जि प व प्राथ.शाळा राजुरला जिल्हा परिषद सदस्य संदिपभाऊ भगत सरपंच प्रणालीताई अस्लम शाळा शिक्षण समीतीच्या अध्यक्ष सोनालीताई भुसारी, शाळेचे मुख्याध्यापक निरे सर, सहाय्यक शिक्षीका स्वप्ना पावडे, छाया वागदरकर सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

कर्तव्यावर असतांना आरोपी हल्ल्यात विरमरन आलेले राजेंद्र कुळमेथे यांच्या पत्नी श्रीमती माया राजेंद्र कुळमेथे यांचा साडी चोळी देऊन सत्कार करण्यात आला.

लाॕकडाऊन च्या काळात सुध्दा गरजुवंताना आवश्यक त्या वस्तुंची मदत करुन आपल्या सामजिक बांधिलकीचा ठसा ध.कु.महिला आघाडीच्या अध्यक्ष वंदनाताई आवारी त्यांनी ठेवला आहे.

Previous articleइंदापूर महाविद्यालयाच्या फरजाना शेख या विद्यार्थिनीस विद्यापीठाचे सुवर्णपदक
Next articleपेच नवेगाव खैरी डॅम मध्ये पाणी साठा ९४.६३% (३२४.८९एम एम क्युब) सकाळी सहा गेट बंद केले ,सध्या ८ आठ गेट ने ०,३|मिटर ने २५३क्युमेक्स प्रति सेकेड चे गती ने पानी सोडले जात आहे उपविभागिय अभियंता नागदिवे यांची माहीती नदीकाठावरील गावांत तलाठी,गामसेवक सतर्क