इंदापूर महाविद्यालयाच्या फरजाना शेख या विद्यार्थिनीस विद्यापीठाचे सुवर्णपदक

 

 

इंदापूर तालुका प्रतिनिधी, दिनांक. 17 बाळासाहेब सुतार 

इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील एम.एससी. ऑरगॅनिक केमिस्ट्री विभागाची विद्यार्थिनी फरजाना शेख हिला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सुवर्ण पदक जाहीर झाले.

महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, संस्थेचे सचिव मुकुंद शहा,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांच्या हस्ते तिचा सन्मान करण्यात आला. संस्थेच्या उपाध्यक्षा पदमा भोसले यांनी फरजाना शेख चे अभिनंदन केले.

महाविद्यालयात अनेक विद्यार्थी सुवर्णपदक प्राप्त करीत असल्याने महाविद्यालयाच्या शैक्षणिक वैभवा मध्ये भर पडत असल्याचे मत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी मत व्यक्त केले.

आज मिळालेले सुवर्णपदक हे सूचक आहे की संस्थेची प्रगती कोणत्या दिशेने चाललेली आहे असे मत संस्थेचे सचिव मुकुंद शहा यांनी यावेळी व्यक्त केले.

प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी विद्यार्थी उत्कृष्ट यश संपादन करत असून संशोधन क्षेत्रात प्राध्यापक उत्कृष्ट कामगिरी करीत आहेत.

यावेळी उपप्राचार्य प्रा. नागनाथ ढवळे, क्रीडासंचालक डॉ. भरत भुजबळ,रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. रामदास ननवरे, प्रा.उत्तम माने, डॉ. राजेंद्र भोसले, डॉ महादेव शिंदे यावेळी उपस्थित होते.

Balasaheb Sutar
Reporter
Mob.9850628160