ई-पास तसेच शेती व शैक्षणिक परवाने वगळता इतर सर्व प्रवासी ऑफलाईन परवाने रद्द

97

 

संपादक जगदिश वेन्नम

गडचिरोली,(जिमाका)दि.17: गडचिरोली जिल्हयातील अधिनस्त विभाग प्रमुख, कार्यालय प्रमुख, वित्तीय संस्था, निमशासकीय संस्था,इतर संस्था, कंत्राटदार, नागरिकांचा समृह,नागरिक यांना सुचित करण्यात येते की, या कार्यालयाद्वारे तेंदु पत्ता निविदाधारक व त्यांचे अधिनस्त कर्मचारी यांना ये-जा करण्यासाठी, ग्रामीण भागातील रस्त्यांच्या कामासाठी, जलसिंचन/जलसंधारण प्रकल्पाचे कामासाठी, मान्सुनपूर्व कामे पार पाडण्यासाठी मोबाईल नेटवर्क चे संबंधाने तांत्रिक विघाडाची दुरुस्ती करण्यासाठी, राईस मिलर्स (सीएमआर) यांना तांदुळ ने-आण करण्याच्या कामासाठी, फायबर केबल उभारणासाठी, दुसऱ्या जिल्हयातील कार्यालयप्रमुख म्हणून समकक्ष पदाचा अतिरिक्त कार्यभार असल्यास जाणे-येणे करण्यासाठी, बाहेरील राज्यातुन /जिल्हयातून मजूर आणण्यासाठी , प्रकल्पाच्या कामासंबंधाने मशिनरीज ने-आण करण्यासाठी गोण खनिजांची विक्री करण्यासाठी , उपसा सिंचन योजनेचे कंत्राटदार यांना ये-जा करण्यासाठी, रुई गाठी साठवणूक करण्यारीता मजूर आणण्यासाठी, कापूस खरेदीसाठी, दुरसंचार विभागाचे साहित्य आणण्यासाठी , कारागृह बंद्यांना मुळ गावी जाण्यासाठी, उर्जा प्रकल्प अभारणीची कामे करण्यासाठी तसेच इतर अत्यावश्यक सेवा देणाऱ्या पुरवठाधारकांना जिल्हयात ये-जा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे वेळोवेळी ऑफलाईन परवाने देण्यात आले होते. सदरचे परवाने आज जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी परिपत्रकान्वये ताबडतोड अंमलासह रद्द केले आहेत.
फक्त जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे निर्गमित करण्यात येत असलेले ई-पास त्याचप्रमाणे तहसिलदार यांनी शेतीकामासाठी व शैक्षणिक कामासाठी निर्गमित केलेले परवाने नियमितपणे चालु राहतील अशा सूचना आज जिल्हाधिकारी यांनी परिपत्रकान्वये निर्गमित केले आहेत.