Home महाराष्ट्र ‘कोरोनाचा रत्नागिरी बाजारपेठेत थैमान’ या अफवेमुळे ग्राहकांची अत्यल्प गर्दी व्यापार्‍यांनी व्यक्त केली...

‘कोरोनाचा रत्नागिरी बाजारपेठेत थैमान’ या अफवेमुळे ग्राहकांची अत्यल्प गर्दी व्यापार्‍यांनी व्यक्त केली नाराजी

129

 

प्रतिनिधी : निलेश आखाडे

रत्नागिरी : ग्राहकांमध्ये भीती निर्माण होईल असा मेसेज सोशल मीडियामध्ये हे फिरत आहे. शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या राम आळी, गोखले नाका परिसरातील व्यापार्‍यांना कोरोना झाला आहे, त्यामुळे बाजारपेठेत जाऊ नका असा समाज माध्यमातून मेसेज
रविवारी दिवसभर विशेषतः व्हॉट्सअपद्वारे मेसेज फिरत होता. काल बाजारपेठ बंद होती. परंतु या अफवेच्या मेसेजचा एवढा परिणाम झाला की आज सकाळपासून राम आळी, गोखले नाका, राधाकृष्ण नाका, मारूती आळी, गाडीतळ या भागांमध्ये ग्राहकांची अत्यल्प गर्दी पहायला मिळाली यामुळे येथील व्यापार्‍यांनी नाराजी व्यक्त केली. रत्नागिरी शहर परिसरामध्ये अनेक ठिकाणी या वरती चर्चा रंगलेली पाहायला मिळत होती. लोकांच्या मनामध्ये एक भीती निर्माण झाली होती.
लॉकडाऊनमुळे सुमारे दोन ते तीन महिने बाजारपेठ बंद होती. परंतु ती काही अटी-शर्तींवर उघडली असली तरीही गर्दी होत नव्हती. परंतु खरेदीसाठी ग्राहक येत होते. यंदा सर्व सणांवरही कोरोनाचे संकट असल्याने बाजारपेठेत खरेदीचा ट्रेंड दिसत नाही. आता लाडक्या बाप्पाच्या उत्सवासाठी सर्व प्रकारच्या विक्री होईल, अशी आशा व्यापार्‍यांनी बाळगली होती. आता बाप्पाच्या आगमनाला फक्त चार-पाच दिवस राहिले असून बाजारात ग्राहक येण्याची शक्यता जास्त आहे. मास्क, सॅनिटायझर वापर व सामाजिक अंतर पाळूनच व्यापारी व्यवसाय करत आहेत परंतु यावर कोराना अफवेच्या मेसेजने मात्र ग्राहकांनी बाजारपेठेकडे पाठ फिरवली असून व्यापारी मात्र नाराज आहे. अशी अफवा पसरवणे चुकीचे असल्याचे मत व्यापारी वर्गातून व्यक्त होत आहे.

*दखल न्यूज भारत*

Previous articleमुख्यमंत्र्यांचे आभार ! उपकरप्राप्त इमारतीतील लाखो रहिवाशांना आता दिलासा मिळणार : म्हाडा सभापती विनोद घोसाळकर
Next articleई-पास तसेच शेती व शैक्षणिक परवाने वगळता इतर सर्व प्रवासी ऑफलाईन परवाने रद्द