घुग्घुस येथे सापडला पुन्हा एक कोरोना रुग्ण

0
70

प्रशांत चरड़े,
चंद्रपुर जिल्हा प्रतिनिधि,

घुग्घुस येेेथे सोमवारी सकाळी बाहादे ले-आउट येथील राहनारा एक व्यक्ती खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असतांना प्रा.आ. केंद्रात तपासणी करीता गेले असता तो कोरोना बाधीत आढळला. सुत्रानुसार मिळालेल्या माहिती नुसार तो लाॅयड्स मेटल कंपनीतील कामगार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता घुग्घुस येथील कोरोोना बाधित रुग्णांची संख्या २० झाली आहे.

सर्व प्रथम २५ मे ला लाॅयड्स काॅलनीत कोरोना बाधीत रुग्ण आढळुन आल्याने खळबऴ उडाली होती .त्यामुळे घुग्घुस येथे कोरोना संक्रमणाची भिती वाढली आहे. घुग्घुस येथील इंदिरानगर येथे २, रामनगर येथे ४, सुभाषनगर येथे ४, शालिकराम नगर येथे ३, अमराई वार्ड येथे १,श्रीराम वार्ड येथे ५, केमीकल नगर येथे १ व नकोडा येथे ५ यात एसीसी काॅलनीतील एका महिलेचा कोरोना मुळे मॄत्यु झाला आणी लाॅयड्स काॅलनी येथे १ कोरोना बाधीत रुग्ण आढळुन आल्याने घुग्घुस येथे 5 दिवसाचे लॉक डाउन घोषित करण्यात आले आहे.