घुग्घुस येथील पाच दिवसीय सम्पूर्ण लॉक डाउन चा पहिल्याच दिवशी उडाला फज्जा

127

प्रशांत चरड़े,
चंद्रपुर जिल्हा प्रतिनिधि,
घुग्घुस ग्रामपंचायत क्षेत्रात दिनांक १६ अगस्त रोजीचे सायंकाळी ६ वाजता पासुन ते दिनांक २० अगस्त रोजीचे रात्री ११:५९ वाजता पर्यंत लाॅकडाऊन घोषित करण्यात आले आहे.
१४ अगस्त को रोजी तहसील कार्यालय चंद्रपुर प्राप्त प्रस्तावानुसार घुग्घुस ग्रामपंचायत क्षेत्रात व लगतच्या क्षेत्रात २४ व्यक्ती कोरोना बाधीत झाले असल्याचे निदर्शनास आले आहे.

हे कोरोना बाधीत इतर नागरिकांच्या संपर्कात आले असल्याची शक्यता नाकारता येत नसल्याने रुग्णांचा संपर्कात आलेल्या नागरीकांचा लवकरात लवकर शोध घेणे आवश्यक आहे. घुग्घुस ग्रामपंचायत क्षेत्रात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी हे पाच दिवसीय लाॅकडाऊन घोषित करण्यात आले आहे.

घुग्घुस ग्रामपंचायत क्षेत्रात नागरिकांचे अवागमनसह खालील अस्थापना संपुर्णता बंद करण्यात येत आहे. सर्व किराणा दुकाने किरकोळ दुकाने व ठोक विक्रेते, सर्व इतर व्यवसाय करनारे व्यापारी,दुकानें,अस्थापना संपुर्णता बंद राहतील. सर्व प्रकारचे केश कर्तनालय, सलुन, ब्युटी पार्लर बंद राहतील, उपहार ग्रॄह, लाॅज, हाॅटेल बंद राहतील शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था, शिकवनी वर्ग बंद राहतील. मास, मासे, चिकन, अंडी विक्री बंद राहतील.
सार्वजनिक व खाजगी प्रवासी दोन चाकी, तिन चाकी व चार चाकी वाहने संपुर्णता बंद राहतील. पेट्रोल पंप व गॅस पंप सकाळी ९ ते ६ वाजेपर्यंत सुरु राहतील. मेडीकल दुकानें सकाळी ९ ते ७ वाजेपर्यंत सुरु राहतील. शिवभोजन थाळी सुरु राहतील. असे आवाहन कोवीड १९ समीती घुग्घुस ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतिने करण्यात आले होते मात्र लॉक डाउन च्या पहिल्याच दिवशी वेगळेच चित्र बघावयास मिळत आहे.
आज सकाळ पासुनच घुग्घुस येथे संचारबंदीचा फज्जा उडाला आहे. नागरिकांचे येने जाने सुरुच आहे दुचाकी वाहने व चार चाकी वाहने रस्त्यावर धावत आहे. घुग्घुस येथे १९ कोरोना बाधीत रुग्ण आढळले असून त्याचे गाम्भीर्य प्रशासनास अजूनही कळले नसल्याचे या प्रकारावरुन दिसून येत आहे.
रविवारला सायंकाळी ६ वाजता दरम्यान पासुन लाॅकडाऊन घोषित करण्यात आले होते. परंतु प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाने पहिल्या दिवशीच संचारबंदीचा फज्जा उडाला. बारा तास लोटुन सुद्धा घुग्घुस बसस्थानक चौकात पोलीसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला नाही. तसेच घुग्घुस शहराची सिमा सिल करण्यात आलेली नाही. त्यामुळे घुग्घुस येथे कोरोना संक्रमणाची भिती वाढली आहे.