पिंपरी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या समोर  विद्यमान सरपंच आबासाहेब बोडके पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले

0
64

 

इंदापूर तालुका प्रतिनिधी दिनांक 17 बाळासाहेब सुतार

पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथे भारत देशाच्या  74 स्वातंत्र्य दिनानिमित्त पिंपरी बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालया समोर पिंपरी बुद्रुक गावचे विद्यमान सरपंच आबासाहेब तुळशीराम बोडके पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसमोर पिंपरी गावचे आदर्श व्यक्तिमत्व बबन दादा बोडके पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच महाराष्ट्र शासनाच्या नियमाप्रमाणे चार ते पाच व्यक्ती उपस्थित राहून झेंडावंदन करण्यात आले. या वेळी पिंपरी गावचे आदर्श व्यक्तिमत्व बबन दादा बोडके पाटील, पिंपरी बुद्रुक गावचे विद्यमान सरपंच आबासाहेब बोडके पाटील, माजी. सरपंच श्रीकांत बापू बोडके पाटील, उप सरपंच प्रतिनिधी दादा भाई शेख तलाठी भाऊसाहेब बी.एस. तिकुटे, ग्रामसेवक बळीराम शिंदे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर लोखंडे, उपस्थित सर्व शिक्षक व ग्रामपंचायत कर्मचारी

————————————————-

फोटो:-ओळी-

पिंपरी बुद्रुक येथील ग्रामपंचायत कार्यालया समोर ध्वजारोहन करीत असताना पिंपरी बुद्रुक गावचे सरपंच आबासाहेब बोडके

फोटो:-ओळी- पिंपरी बुद्रुक येथे जिल्हा परिषद प्राथमिक विद्यालयाच्या समोर ध्वजारोहण करीत असताना बबन दादा बोडके.

Balasaheb Sutar
Reporter
Mob.9850628160