कोराडी पांजरा वस्तीत एकाच कुटुंबातील ३ जण कोरोना पाँजिटीव सदर पोलीस स्टेशन ला कार्यरत कर्मचारी २ दिवसांपासून होता होम कोरोंटाईन

 

सुनील उत्तमराव साळवे(९६३७६६१३७८)
कार्यकारी संपादक, दखल न्यूज भारत नागपुर

कोराडी पांजरा /नागपुर: १७ आँगस्ट २०२०
नागपुर जिल्ह्यातील कामठी तालुक्यात असलेल्या कोराडी ग्रा पं. अंतर्गत पांजरा वार्ड क्रमांक १ मध्ये राहणाऱ्या एका पोलिस कर्मचारी यांचे घरातील दोन जण कोरोना पाँजिटीव निघाले आहे.
कोराडी ग्रा. पं. चे सचिव उत्तम झेलगोंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार सदर पोलीस कर्मचारी हा कोराडी पो. स्टे. आधी कार्यरत होता. त्यानंतर त्याची बदली सदर पोलीस स्टेशनला झालेली होती. प्राप्त माहितीनुसार या कर्मचाऱ्याची कोव्हीड टेस्ट झाली तिचा रिपोर्ट १५ तारखेला पाँजिटीव आला होता त्यांनी १५ तारखेला गुमथी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांना याबाबत रात्री उशिरापर्यंत कळविले होते. गुमथी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांनी त्या पोलीस कर्मचारी यांस घरीच होम कोरोंटाईन केले होते. काल त्याच्या घरच्या आई वय (७२वर्ष) आणि भाऊ(५२ वर्ष) यांचे सोबत एकुण ७ जणांच्या टेस्ट महादुला नगरपंचायत येथे केल्या असता त्यांची आई आणि भाऊ हे दोघेही पाँजिटीव निघालेत. मिळालेल्या माहितीनुसार या दोघांना ही कोरोना चे कुठलेही लक्षण नव्हते असे समजते. कोराडी ग्रा. पं. चे सचिव उत्तम झेलगोंदे, उपसरपंच उमेश निमोने आपल्या ग्रा पं कर्मचारी यांचे सोबत या पोलीस कर्मचारी याच्या घरी पोहोचले. या परिसरात सोडियम हायपो क्लोरोईड ची फवारणी केली.
प्राप्त माहितीनुसार गुमथी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल राऊत, डॉ. नारनवरे हे घटनास्थळी पोहोचले असुन या तिघांना ही कोव्हीड सेंटरला भर्ती करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. कोराडी ग्रा पं प्रशासनाने या घराला प्रतिबंधक क्षेत्र म्हणून घोषित केले आहे.
गुमथी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल राऊत यांनी दखल न्युज भारत पोर्टल व यु ट्युब चैनल चे कार्यकारी संपादक सुनील साळवे यांना माहिती दिली की, आम्ही या परिवारातील ३ ही पेशंट ला वारेगाव येथील कोव्हीड सेंटरला पाठवायला आलो असता त्यांनी वारेगाव येथे जाण्यासाठी नकार दिला आहे. त्यांना म्हटले की आपण घरी राहाल तर आपल्या कडे डाँक्टर्स येऊन ट्रिटमेंट करु शकणार नाही. मात्र या तिघांनी त्यांना लिहुन दिले की आमचे काही कमी जास्त झाल्यास आम्हीच जिम्मेदार राहु.
या क्षेत्रातील जि. प सदस्य नानाभाऊ कंभाले यांनी या कुटुंबाची समजुत काढण्याचा व वारेगाव येथील कोव्हीड सेंटरला उपचारासाठी भर्ती होण्याची विनंती केली पण हे कुटुंबीय उपचारासाठी जायला तयार नाही असे डॉ. राऊत यांनी सांगितले.