Home गडचिरोली गोडलवाहि शासकिय आश्रमशाळेत११३ बटालियनचे कमांडर रत्ना प्रसाद यांच्या हस्ते ध्वजारोहण

गोडलवाहि शासकिय आश्रमशाळेत११३ बटालियनचे कमांडर रत्ना प्रसाद यांच्या हस्ते ध्वजारोहण

117

 

धानोरा/भाविकदास करमनकर

सी.आर.पी.एफ. 113 बटालियन चे कमांडेंट श्री जी. डी. पंढरीनाथ यांच्या दिशा निर्देशानुसार 113 बटालियन च्या डी कंपनी चे कंपनी कमांडर निरीक्षक रत्ना प्रसाद यांनी अति दुर्गम भागातील शासकीय माध्यमिक आश्रम शाळ गोडलवाही मधे ध्वजारोहण करुण 74 वा स्वतंत्रता दिवस साजरा केला. ध्वजारोहण केल्या नंतर सर्वानी एकत्र राष्ट्रगीत गाइले त्या नंतर रत्ना प्रसाद यांनी शाळेतील विद्यार्थी व गावातील नागरिकांना स्वतंत्र दिवसाच्या शुभेच्छा देऊन, स्वतंत्र प्राप्त करण्या करिता केलेले संघर्ष व बलिदान याची माहिती देऊन स्वतंत्र्याचे महत्व पटउन दिले. शेवटी 113 बटालियन कडुन सर्वाना मिठाई चे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाला शासकीय आश्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री डी. एस. सहारे यांच्यासह शाळेचे शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांनी व गवकार्यांनी मोठ्या संखेत भाग घेतला.

Previous articleपांच दिवस लॉक डाऊन चा का फायदा:- राजू झोड़े बळजबरीने लादलेला लॉक डाऊन तात्काळ मागे घ्या
Next articleप्रशासनातर्फे पूरपरिस्थितीवर उत्तम प्रकारे नियंत्रण.