Home चंद्रपूर  पांच दिवस लॉक डाऊन चा का फायदा:- राजू झोड़े बळजबरीने लादलेला लॉक...

पांच दिवस लॉक डाऊन चा का फायदा:- राजू झोड़े बळजबरीने लादलेला लॉक डाऊन तात्काळ मागे घ्या

151

 

शंकर महाकाली
दख़ल न्यूज़ भारत
पोर्टेल न्यूज व यूट्यूब चैनल
चंद्रपुर/बल्लारपुर तालुका प्रतिनिधि
📲 8855043420

बल्लारपूर :- कोणतेही पूर्व नियोजन केल्या शिवाय बल्लारपूर जनतेला जाणीव पूर्वक वेठीस धरण्यासाठी शासन-प्रशासनाने दिनांक 18 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट या दरम्यान लागू करण्यात आलेला लॉक डाऊन म्हणजे कोरोनाच्या निमित्ताने लादलेला अतिरेकी पणा असून,हा लॉक डाऊन तात्काळ मागे घेण्यात यावा, अशी मागणी उलगुलांन संघटनेचे नेते राजू झोडे यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
शासन – प्रशासनाने कोणतीही पूर्व नियोजन न करता बल्लारपूर शहरातील जनतेवर हा लॉक डाऊन लादण्यात आल्याने हातावर पोट असणारे गोरगरीब,किरकोळ व्यवसायी,व्यापारी,कामगार यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले असतांना हा लॉक डाऊन म्हणजे जनतेला मारण्यासाठी प्रेरित करण्याचा प्रकार असल्याचे राजू झोडे यांनी निवेदनात म्हंटले आहे.

त्यातच चंद्रपूर जिल्हा आणि बल्लारपूर शहरात कोरोनाच्या काळात आर्थिक संकटा मुळे अनेक व्यवसायी आणि युवकांनी आत्महत्या केली आहे.ही गंभीर आणि दखलपात्र बाब लक्षात न घेता प्रशासनाने लादलेला हा लकडाऊन कशासाठी?असा सवालही झोडे यांनी उपस्थित केला आहे.

पारंपरिक सण,पोळा,गणेश उत्सव,यावर विरजण टाकून शासनाला काय हशील होईल?असा सवाल उपस्थित करत लवकरात लवकर लॉक लादलेला लॉक डाऊन मागे घेण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.मागणीच्या निवेदनाची प्रत पालकमंत्री विजय वडेट्टीवार,आणि चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आली आहे.

यावेळी उलगुलांन संघटनेचे नेते राजू झोडे यांच्या समवेत संपत कोरडे,सचिन पावडे,झाकीर खान,भूषण पेटकर उपस्थित होते.

Previous articleनगरपरिषद कर्मचार्यांच्या विविध मागण्या साठी एक दिवसीय काम बंद आंदोलन
Next articleगोडलवाहि शासकिय आश्रमशाळेत११३ बटालियनचे कमांडर रत्ना प्रसाद यांच्या हस्ते ध्वजारोहण