नगरपरिषद कर्मचार्यांच्या विविध मागण्या साठी एक दिवसीय काम बंद आंदोलन

177

 

शंकर महाकाली
दख़ल न्यूज़ भारत
पोर्टेल न्यूज़ व यूट्यूब चैनल
चंद्रपुर/बल्लारपुर तालुका प्रतिनिधि
📲 8855043420

बल्लारपुर :- भारतीय नगर परिषद कर्मचारी संघाचे तथा संघर्ष समिती वतीने नगर परिषद कर्मचाऱ्यांचा दिनांक 17 आगस्ट 2020 ला एक दिवसीय काम बंद आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रातील संपूर्ण नगर परिषद/ नगर पंचायत कर्मचारी बल्लारपूर नगर परिषद कर्मचाऱ्यांनी सुद्धा सहभाग घेतला आहे संघर्ष समिती व इतर संघटनेने नाईलाजाने कोरोना काळात अति संवेदनशील परिस्थिती असतांना काम बंद करण्या चा निर्णय घेतला या काम बंद आंदोलनांची दखल जर शासनाने गंभीरतेने घेतली नाही तर खलील विविध मागण्या मान्य ना केल्यास उग्र आंदोलन करण्याचे निर्णय कृती समिती व सहभागी संघटने घेतला आहे प्रमुख मागण्या
1. 100% वेतन शासना मार्फत कोषागारात जमा करून कोषागारातचा माध्यामातून कर्मचाऱ्याच्या खात्यात जमा करावी
2. वर्ग 3 चे कर्मचाऱ्यांना 2800 ऐवजी 4200 ग्रेड पे लागू करणे
3.स्वच्छता निरीक्षक सर्वांगात पात्र कर्मचाऱ्यांच्या तात्काळ पदस्थपना करणे
4. सफाई कर्मचाऱ्यांना वरिष्ठ पदावर पदोन्नती देने 5.सफाई कामगारांना डॉ. बाबासाहेब श्रम साफल्य योजनेतून मोफत घरे बांधून देने
6. वर्ग 4 चे कर्मचाऱ्यांना पदोन्नती देने
7. 2005 नंतर नियुक्त कर्मचाऱयांचे DCPS/NPS खाते सुरू करून नियुक्तीची तारखेपासून शासन खाती रक्कम जमा करणे
8. 7 वेतन आयोगा नुसार 10- 20-30 वर्षाचे सेवा अंतर्गत पदोन्नतीचा जी आर तात्काळ काढणे
9. शासन निर्णय नुसार नगर पालिका कर्मचार्यातून मुख्य अधिकारी पदावर पद भरती तात्काळ करणे
10. 500 व्यक्ती मागे 1 सफाई कामगार नियुक्त करणे लाड पागे समिती शिफारस नुसार सफाई कामगाराची नियुक्ती करणे, सफाईचे कामे कंत्राट पध्द्तीने देने बँड करणे व नवीन सुधारित आकृतिबंध लागू करणे
11. जिल्हाधिकारी कार्यालयात नगर परिषद जिल्हा प्रशासनांचे कामकाज महसुल विभाग पासून विमुक्त करून थेट नगर विकास विभागा मार्फत करणे बल्लारपूर शाखा मार्फत सदर आंदोलनास अध्यक्ष श्री किशोर राहुड, शब्बीर अली मीर जब्बार, तेजबहादूर थापा, अभिजित मोटघरे, शिथिल हाडके, संजय बोढे, जयवंत काटकर,हंसारानी आर्य, संगीता उमरे, राजेंद्र बाराहाते, पुरुसोत्तम नागतुरे,विलास कापसे, राम अवतार चुनियाने, पप्पू ढेनवाल, किशोर डाखोरे,गजानन तुमराम, शाम परसुटकर व समस्त नगर पालिका बल्लारपूर चे अधिकारी व कर्मचारी सहभागी होते