चंद्रपुर मेडिकल कॉलेज कंत्राटी कर्मचारी वर्गाचे वेतन त्वरित देण्याची शिवसेने ची मागणी

प्रशांत चरड़े,
चंद्रपुर जिल्हा प्रतिनिधि
संपूर्ण देशात व महाराष्ट्र तसेच चंद्रपूर मध्ये सुद्धा कोरोना महा संकट आले आहे या महामारी मध्ये चंद्रपूर मेडिकल कॉलेज मध्ये कंत्राटी कर्मचारी दिवस रात्र प्रामाणिक पणे रुग्णाची सेवा करीत आहे व त्या कामगारचे वेतन न मिळाल्या मुळे त्याच्या कंत्राटी कामगार वरती उपासमारीची वेळ आली आहे या साठी कंत्राटी कर्मचाऱ्याचे वेतन ताबडतोब देण्यात यावे असे शिवसेना चंद्रपूर तर्फे आज वैद्यकीय महाविद्यालयचे अधिष्ठता मा. मोरे साहेब आणि महाराष्ट्र राज्य चे आरोग्य, कुटुंब कल्याण, अन्न व औषधी प्रशासन वस्त्रोद्योग वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक राज्य मंत्री यांना निवेदन देण्यात आले यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप गिर्हे, शिवसेना महानगर प्रमुख प्रमोद पाटील, सोनू ठाकूर देवा भाऊ, रोहित नलके यांची उपस्थिती होती.