नगर पंचायत कर्मचारी संघटनेचे एक दिवसीय काम बंद आंदोलन,राज्य व्यापी आंदोलनात सहभाग (प्रशासनाला प्रलंबित मागण्याचे निवेदन सादर)

98

कूरखेडा/राकेश चव्हान प्र
येथील नगर पंचायत कर्मचारी संघटनेचा वतीने आज शासनाचा उदासीन धोरणामूळे प्रलंबीत असलेल्या विविध मागण्याकडे लक्ष वेधण्या करीता महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी संघटनेचा वतीने आयोजित राज्य व्यापी आंदोलनात सहभागी होत एक दिवसीय काम बंद आंदोलन करण्यात आले
आंदोलक कर्मचार्यानी शासनाकडे निवेदन पाठवत प्रलंबीत प्रश्न तातळीने निकाली काढण्याची मागणी केली आहे निवेदनात कर्मचार्यांचे थकीत वेतन तात्काळ अदा करण्यात यावे,नव्याने निर्मीत नगरपरिषद/नगरपंचायत मधील उदघोषणे पूर्वीचे व उदघोषणे नंतरचे सर्व कर्मचार्यांचे समावेषन करने,रोजंदारी कर्मचार्यांना कायम करने,सफाई कामगाराना मुकादम पदावर पदोन्नती देने,लिपीक संवर्गाला पदोन्नती देत वरिष्ठ वेतनश्रेणी लागू करणे, कर्मचार्यांचा पेंशनचा प्रश्न मार लावने, सातव्या वेतन आयोगाचा शिफारसी लागू करने तसेच अन्य प्रश्न तात्काळ मार्गी लावण्या मागणी करण्यात आली आहे या मागण्याचा पूर्ततेकरीता आज राज्य व्यापी एक दिवसीय काम बंद आंदोलन करण्यात आले आंदोलनात येथील नगरपंचायतीचे कर्मचारी अज्ञान पेंदाम,हिराकांत कोसरे रोशन मेश्राम देविदास देशमुख नामदेव राऊत महादेव दोनाडकर संजय दोनाडकर राजेश कटकवार सहभागी झाले होते