Home चंद्रपूर  चंद्रपूर फेरो अलॉय प्लान्ट येथे खाजगी सुरक्षा रक्षकांचे आर्थिक शोषण- मनसेने दिला...

चंद्रपूर फेरो अलॉय प्लान्ट येथे खाजगी सुरक्षा रक्षकांचे आर्थिक शोषण- मनसेने दिला CFP प्रशासनाला दम

127

 

शंकर महाकाली
दख़ल न्यूज़ भारत
पोर्टेल न्यूज़ व यूट्यूब चैनल
चंद्रपुर/बल्लारपुर तालुका प्रतिनिधि
📲 8855043420

चंद्रपुर :- भारत सरकारच्या स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया अंतर्गत येत असलेले चंद्रपूर फेरो अलॉय प्लांट हे भारतातील एकमेव सार्वजनिक मॅग्नीज बेस स्टील प्लांट आहे. 2011 मध्ये MEL चे स्टील अथोरिटी ऑफ इंडिया मध्ये समायोजन करण्यात आले .या प्लांटची सुरक्षेची जबाबदारी मागील अनेक वर्षापासून खाजगी सुरक्षा एजन्सीला देण्यात आली आहे. 2018 मध्ये स्टील प्लांट सुरक्षेची जबाबदारी चे कंत्राट मुंबई स्थित ब्राईट गार्ड फोर्स कंपनीला देण्यात आले .या खाजगी सुरक्षा कंपनी अंतर्गत 121 गार्ड चंद्रपूर फेरो अलॉय प्लांटमध्ये सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत आहे. त्यात दोन महिलांचा देखील समावेश आहे. चंद्रपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ व सहाय्यक कामगार आयुक्त चंद्रपूर यांच्या सूचनेप्रमाणे वेळोवेळी सुरक्षारक्षकांना वेतन देण्यास खाजगी सुरक्षा रक्षक कंत्राटदार कराराप्रमाणे बाध्य आहे .मागील अनेक वर्षापासून चंद्रपूर फेरो अलॉय प्लांटमध्ये कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकांचे नियमबाह्य आर्थिक शोषण केल्या जात आहे. त्यांना मिळणाऱ्या सोयीसुविधा पुरविल्या जात नाही. वेतन कायदा 1936 प्रमाणे कामगारांना किती पेनॉल्टी लावावी याचे काही निकष आहे. तसेच कामगारांवर लावण्यात आलेले पेनॉल्टी रकमेचा तपशील ठेवणे व पेनॉल्टी तून जमा झालेली रक्कम कामगारांच्या हितासाठी खर्च करणे अनिवार्य आहे.मात्र ब्राईट गार्ड फोर्स कंत्राटदाराच्या वतीने सर्रासपणे वेतन कायदा 1936 चे उल्लंघन करण्यात येत आहे. कार्यरत सुरक्षारक्षक काही कारणास्तव गैरहजर राहिल्यास त्यांच्यावर सरसकट 500 रुपये पेनोल्टी लावण्यात येते. अशाप्रकारे महिन्यातून सुरक्षा रक्षकांचे पेनॉल्टी च्या नावाखाली 500 ते 2000 रुपये त्यांच्या पगारातून कपात केले जात आहे. पगारी रजा, मेडिकल रजा उपलब्ध असून सुध्हा सुरक्षा रक्षकांकडून अर्ज स्वीकारला जात नाही. अशाप्रकारे ब्राईट सेक्युरिटी फॉर्स कंपनीतर्फे सुरक्षारक्षकांचे आर्थिक शोषण सुरू आहे. त्याचबरोबर इन्शुरन्स अॅक्ट 1948 प्रमाणे कोणत्याही सुरक्षारक्षकांचा विमा उतरविण्यात आला नाही. त्यांना वार्षिक गणवेश, हातमोजे ,टोपी, टॉर्च बॅटरी, लाठी ,गमबूट आधी सुरक्षेचे साहित्य देखील देण्यात आले नाही. कंपनी कराराप्रमाणे महिन्याच्या 7 तारखेला सर्व सुरक्षा रक्षकांचे पगार देणे अनिवार्य असताना देखील पगार देण्यात ब्राइट कार्ड पोर्ट कंपनी उशीर करते.प्रत्येक महिन्याच्या15 तारखेला कामगारांना पगार मिळतो. त्याबद्दल कुठलीही नुकसानभरपाई कंत्राटदार सुरक्षारक्षकांना देत नाही. नियमाप्रमाणे दर महिन्याला कंत्राटदार पगाराची पावती देत नाही. होणाऱ्या अन्यायाची तक्रार खाजगी सुरक्षा रक्षकांनी अनेकदा कंपनी प्रशासन, सहाय्यक कामगार आयुक्त चंद्रपूर, सहाय्यक श्रम आयुक्त केंद्रीय चंद्रपूर यांच्याकडे करून देखील कंत्राटदारावर व दोषी अधिकाऱ्यांवर कुठलीही कारवाई झाली नाही. खाजगी सुरक्षा रक्षकांनी त्यांच्यावर होणार्‍या अन्यायाची तक्रार मनसे नगरसेवक सचिन भोयर यांना देताच सचिन भोयर यांनी मनसे पदाधिकाऱ्यांसह चंद्रपूर फेरो अलॉय प्लांट प्रशासनाची भेट घेतली. महाप्रबंधक सोनिता कटारिया यांना होणाऱ्या गैरप्रकारांची तक्रार दिली. तसेच सेक्युरिटी डीजीएम प्रवीण निस्ताने यांना चांगलेच धारेवर धरले. आठ दिवसात कंत्राटदारांवर कारवाई करून सुरक्षारक्षकांना न्याय द्यावा तसेच कपात करण्यात आलेल्या पेनॉल्टी रकमेचा तपशील सादर करावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सुरक्षारक्षकांचा आंदोलन करण्यात येणार असा इशाराही मनसे नगरसेवक सचिन भोयर यांनी कंपनी प्रशासनाला दिला. यावेळी महिला जिल्हाध्यक्ष सुनिता गायकवाड. शहराध्यक्ष जिल्हा सचिव किशोर मडगुरवार,नितेश जुमडे ,राकेश पराडकर ,अक्षय चौधरी कृष्णा गुप्ता, तुषार येरमे,अर्चना आमटे, प्रवीण शेवते आदी मनसैनिक उपस्थित होते.

Previous articleचंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत 718 बाधित कोरोनातून बरे रविवारी 35 बाधित दाखल ; 48 बाधितांना सुटी जिल्हयात आणखी एकाचा कोरोनामुळे मृत्यू कोरोना बाधितांची एकूण संख्या 1105
Next articleनगर पंचायत कर्मचारी संघटनेचे एक दिवसीय काम बंद आंदोलन,राज्य व्यापी आंदोलनात सहभाग (प्रशासनाला प्रलंबित मागण्याचे निवेदन सादर)