वणी नगर परिषद कर्मचारी संघटनेचे विविध मागण्यासाठी एक दिवसीय काम बंद आंदोलन

0
87

 

वणी : परशुराम पोटे

महाराष्ट् राज्य नगर परिषद,नगर पंचायत,संवर्ग कर्मचारी संघटना व संघर्ष समिती यांच्या वतिने आज दि.१७ आँगष्ट्ला विविध मागण्या संदर्भात घोषित केलेल्या एक दिवसीय संपात वणी नगर परिषद कर्मचारी संघटनेने संपात भाग घेतला.यावेळी नगर परिषद मधिल सर्व विभागातील कामकाज बंद ठेवण्यात आले होते.
महाराष्ट् राज्य नगर परिषद ,नगर पंचायत,संवर्ग कर्मचारी संघटना व संघर्ष समिती यांचेकडुन दि.८ जुलैला राज्य शासनास निवेदन देण्यात आले होते.या निवेदनात शासकिय कर्मचार्याप्रमाणे १०० टक्के वेतन कोषागारा मार्फत देणे,सातवा वेतन आयोगाचा पहिला हप्ता रोखिने देणे,राज्यातील नगर पंचायत मधिल कर्मचारी सर्व कामगारांचे कार्यरत नगर परिषदेत समावेश करणे,सफाई कामगारांना पदोन्नती देणे,मोफत घर बांधुन देणे,सार्वजनिक सुट्टीचा लाभ देणे,नगर परिषदेतील लिपिक,वरिष्ठ लिपिक यांना वरिष्ठ वेतन श्रेणी लागु करणे,सहा.संवर्गातील निवड वेतन श्रेण्या पुनर्जिवीत करणे,नगर अभियंता उपमुख्यधिकारी यांना राजपत्रीत दर्जा देणे,कर व प्रशासकिय तसेच अग्निशमन सेनेतील कर्मचार्यांना ४८०० ग्रेड पे लागु करणे याबाबतच्या मागण्या आहेत.परंतु राज्य शासनाकडुन या मागण्यांकडे वेळोवेळी दुर्लक्ष केले जात आहे.परिणामी आज पुकारलेल्या संपात वणी नगर परिषद कर्मचारी संघटनेने एक दिवसीय संपात सहभाग घेतला.या आंदोलनामुळे नागरीकाच्या होणार्या गैरसोयी तसेच कायदा व सुव्यवस्थेची सर्वस्व जबाबदारी नगर परिषदेवर राहिल असे कर्मचारी संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष विजय महाकुलकर,सचिव धम्मरत्न पाटील यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.