२५ वर्षापासून एकाच पदावर कार्यरत असणाऱ्या शिक्षण विभागातील केंद्रप्रमुख पदास पदोन्नतीची संधी द्यावी आ.कृष्णा गजबे

 

ऋषी सहारे
कार्यकारी संपादक

देसाईगंज दि 17ऑगस्ट- केंद्रप्रमुख पदाची निर्मिती १९९४ ची असून आज कार्यरत केंद्रप्रमुखांना एकाच पदावर २५ वर्ष झाली आहेत .केंद्रप्रमुख पदांना पुढील वरिष्ठ पदाची पदोन्नती मिळत नसल्याने नाईलाजाने त्यांना एकाच पदावरुन सेवानिवृत्त व्हावे लागत आहे.केंद्रप्रमुख पदाची निर्मिती गुणवत्ता विकासासाठी करण्यात आली असून हे पर्यवेक्षकीय पद आहे. त्या पुढील वरिष्ठ पदे शिक्षण विस्तार अधिकारी गटशिक्षणाधिकारी अशी आहेत.शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख यांची शैक्षणिक पात्रता पदवीधर बीएड समान असून दोन्ही पदे पर्यवेक्षकीय असल्याने केंद्रप्रमुखांना वर्ग दोन मध्ये पदोन्नती देणे गरजेचे आहे त्यामुळे पंचवीस वर्षापासून एकाच पदावर कार्यरत असणाऱ्या शिक्षण विभागातील केंद्रप्रमुख पदास पदोन्नतीची संधी द्यावी याबद्दल आ.कृष्णा गजबे यांना निवेदन देताना विजयजी बन्सोड कोशाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश जिल्हा परिषद केंद्रप्रमुख संघ, संजय कसबे संघटक , ब्रह्मानंद जी उईके सचिव व विवेक ची बुद्धे उपस्थित होते.