
प्रतिनिधी / ओंकार रेळेकर.
चिपळूण : कोरोना संकट काळात डॉक्टर मन्सूर परकार येणाऱ्या प्रत्येक रुग्णांची आपुलकीने विचारपूस करून त्यांना धिर देण्याचे महान कार्य करीत आहेत,स्वतःच्या आरोग्याची फार काळजी न घेता परकार सतत रुग्णाच्या सेवेत हजर आहेत,डॉ.मन्सूर परकार रुग्णांसाठी खरे कोविड योध्दा असल्याची प्रतिक्रिया गोवळकोट रोड येथील स्थनिक नगरसेविका शफा गोठे यांनी व्यक्त केली,
कोरोना विषाणू च्या वाढत्या प्रादूर्भाव मुळे सर्वत्र कोरोना रुग्णाची संख्या वाढत असल्यामुळे नागरिकांनी चांगलीच धास्ती घेतल्याचे चित्र आहे,अशा काळात तत्परतेने सेवा बजावत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता डॉ.मन्सूर परकार अविरतपणे वैद्यकीय सेवा बजावत आहेत,या काळात दरवर्षी प्रमाणे नियमित येणाऱ्या आजरपणावर उपचार घेण्या करीता येणाऱ्या प्रत्येक रुग्णांची हसत खेळत आपुलकीने विचारणा करून रुग्णांमधील मानसिक तणाव कमी करून कोरोना रोगाची भिती काढण्याचे महान कार्य डॉ .परकार करीत आहेत,
करोना महामारी सारख्या संकटात आपुलकीची योग्य सेवा देऊन लोकांना महामारी च्या संकटातुन बाहेर काढण्याचे काम करत एक आदर्श निर्माण केल्या मुळे गोवळकोट गावातील नागरिकांनी शनिवारी डॉ. मन्सूर परकार यांचा सत्कार केला. या वेळी बोलतांना गोठे यांनी डॉ.परकार यांना शुभेच्छा दिल्या,या वेळी नगरसेविका शफा गोठे,सामाजिक कार्यकर्ते आरिफ हजवाने , अश्रफ घारे, माजी नगराध्यक्ष अजमल पटेल, शमुन घारे, अल्ताफ सुर्वे.शमीम परकार ,उदय जुवळे आदी नागरिक उपस्थित होते,
*दखल न्यूज भारत*