वीजेअभावी आस्का एल.ई.डी.लाईटनी पूरपरिस्थितवर नजर.

141

अशोक खंडारे उपसंपादक

भामरागड येथील काल १६आॅगष्ट२०२०ला पर्लकोटा नदीला महापूर आला.पूराचे पाणी मुख्य बाजारपेठेत घुसले.सर्वत्र धावपळ सुरू झाली.व्यापारी मिळेल त्या साधनांनी आपापल्या सामानाची आवराआवर करुन सुरक्षित ठिकाणी घेऊन जावू लागले.अख्या दिवसभर पूराचे पाणी वाढतच होते.सायंकाळ झाली.अंधार पडू लागला.दोन दिवसांपासून वीज नाही.अंधारात पूर परिस्थितीवर नजर कशी ठेवायची हा प्रश्र्न प्रशासनाला भेडसावू लागला.अशातच काहीतरी वस्तू तहसील कार्यालयाच्या स्टोअर रुममध्ये असल्याचे नायब तहसीलदार प्रकाश पुप्पूलवार यांच्या लक्षात आले.लगेच त्यांनी ती वस्तू बाहेर काढली ती वस्तू होती आस्का एल.ई.डी लाईट!लगेच भामरागडच्या मुख्य चौकात लावण्यात आली.लाईटचा फोकस एवढा होता की चौकापासून थेट पर्लकोटा नदीपर्यंत सर्व स्पष्ट दिसत होते.त्यामुळे वीजेअभावी सदर आस्का एल.ई.डी.लाईटनी रात्रीच्या वेळी पूरपरिस्थितीवर नजर ठेवता आली
आस्का एल.ई.डी.लाईट गत दोन वर्षांपासून तहसील कार्यालयाच्या स्टोअर रुममध्ये धूळखात पडून होते.मात्र त्याकडे कोणाचेही लक्ष नव्हते.सदर लाईटचा वापर कसा करायचा यांचेही कोणालाच ज्ञान नव्हते.काल ता.१६ ला तहसीलदार सत्यनारायण सिलमवार यांनी नायब तहसीलदार प्रकाश पुप्पुलवार यांना स्टोअररुममध्ये काहीतरी वस्तू असल्याचे सांगितले.पुप्पुलवार यांनी ती वस्तू बघितली व आस्का एल.ई.डी. लाईट असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.या लाईटचा वापर आपण यापूर्वी केला असल्याचे सांगितले.ईतर कोणालाही अनुभव नसतांना स्वत: पुप्पुलवार यांनी प्रयत्न करुन लाईट लावला.चौकापासून पर्लकोटा नदीपर्यंतचा भाग प्रकाशमान झाला व प्रशासनाला पूरपरिस्थितीवर नजर ठेवता आली यावेळी तहसीलदार सत्यनारायण सिलमवार,नायब तहसीलदार पुप्पुलवार,नायब तहसीलदार अनमोल कांबळे, व्यापारीवर्गाची उपस्थिती होती.