Home Breaking News चिमुकल्यांनो तुमची खूप आठवण आली ; ज्यावेळी तुमच्याशिवाय तिरंगा ध्वज फडकला !

चिमुकल्यांनो तुमची खूप आठवण आली ; ज्यावेळी तुमच्याशिवाय तिरंगा ध्वज फडकला !

135

 

प्रतिनिधी / उदय कांबळे

जागतिक कोरोना महामारीमुळे सर्वत्र शाळा , कॉलेज, महाविद्यालये बंद असल्या कारणाने यंदाचा ७४ वा स्वातंत्र्य दिन मुलांशिवाय साजरा झाला . सोशल डिस्टन्सची खबरदारी घेत शासकिय कार्यालयांचे ध्वजारोहन मर्यादित मान्यवरांचे उपस्थित पार पडले . दरम्यान गुडाळ ता . राधानगरी येथील श्री गुडाळेश्वर हायस्कूलच्या प्रांगणात शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सोशल डिस्टन्स राखून स्वता : राष्ट्रगीत व ध्वजगीत गाउन तिरंगा ध्वजास सलामी दिली .मात्र शिक्षकांना आपल्या शाळेच्या चिमुकल्यांची खुप आठवण आली ; ज्यावेळी त्यांच्या शिवाय शाळेचा तिरंगा ध्वज फडकला !
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी आणी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातुन सर्वत्रच शाळा , कॉलेज , महाविद्यालये गेली अनेक महिने बंद आहेत . यंदाचे शैक्षणिक वर्ष जून २०२० ला सुरू झाले असले तरी कोरोनाचा संसर्ग दिवसें दिवस वाढत असल्याने अद्याप सर्वत्र शाळा बंदच आहेत . त्यामुळे या वर्षी स्वातंत्र्य दिन शाळेच्या विद्यार्थ्यांशिवाय साजरा झाला .
ध्वजारोहनासाठी शाळेच्या प्रांगणात गुरूजी आले तेव्हा त्यांना शुकशुकात जाणवला .मुलांच्या रांगा दिसल्या नाही . त्यांचा किलबिलाट ऐैकण्यात आला नाही . सावधान -विश्रामचा आवाज नाही . तिरंगा ध्वज फडकला ;पण इवलेसे नाजूक कोवळे हात सलामी देताना नजरेला आले नाहीत . राष्ट्रगीत -ध्यजगीताचा गोड-मधूर स्वर कानावर पडला नाही . महापुरुषांच्या जयघोषणांनी संपुर्ण परिसर दणाणून सोडणारा आवाज घूमला नाही . चॉकलेट , गोळया , जिलेबीसाठी मुलांचे भरलेले वर्ग दृष्टीस पडले नाही . गावातून प्रभात फेरी झाली नाही .
त्यामुळे शिक्षकांना मुलांशिवाय सर्व काही सुनं_सुनं वाटले . आपल्या शाळेच्या ध्वजारोहनाच्या कार्यक्रमाला आपल्याच शाळेची मुलांच नसन ; ही कल्पना शिक्षकांच्या कल्पनेच्या पलिकडची ठरली असून इतिहासातील पहिलीच घटना म्हणावी लागेल .
शिक्षक आणी विद्यार्थी यांच्यातील नातं अभेद्य मानल जात .विद्यार्थ्यांना मार्ग दाखवणारे , त्यांचे उज्वल भविष्य घडवणारे शिक्षकच असतात . शाळेत असताना आई – वडिलांचे प्रेम देतात दिसतात . त्यांच्याशी मित्राच नात निर्माण करतात . अडीअडचणीला धावून येतात . वेळोवेळी मार्गदर्शन करतात ; आणी म्हणूनच शिक्षक आणी विद्यार्थी यांच्या मध्ये कधीच दुरावा नसतो .
मात्र कोविड १९ महामारीमुळे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात दुरावा झाला आहे . हा दुरावा १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी संपेल असे वाटत असताना दिवसेंदिवस कोरोनाचे संकट वाढतच असल्याने सोशल डिस्टन्सची खबरदारी घेत आपल्या शाळेच्या मुलांशिवाय शिक्षकांना स्वातंत्र्य दिन साजरा करावा लागला . या प्रसंगी शिक्षकांचा कंठ दाटून आला आणि भावनिक होवून म्हणाले ; आपण कधी भेटणार आहोत माहिती नाही . परंतु चिमुकल्यांनो आम्हाला तुमची खुप आठवण आली ; ज्यावेळी तुमच्या शिवाय तिरंगा ध्वज फडकला !

Previous articleऐन गोजोली गावातच चिखलाचे साम्राज्य — नागरिकांचे आरोग्य धोक्यात — प्रशासनाचे दुर्लक्ष
Next articleवीजेअभावी आस्का एल.ई.डी.लाईटनी पूरपरिस्थितवर नजर.