पोही गावात टायफाईडची लागण, गावात सर्वत्र घाणीचे साम्राज्य नागरिकांत रोष

अमरावती(उपजिल्हा प्रतिनिधी, युवराज डोंगरे)
अमरावती जिल्ह्यातील अचलपूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या शिंदी बु ग्रा पं दुर्लक्षपणामुळे पोही या गावात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे त्यामुळे गावात टायफाईडची लागण झाली आहे
गावात पावसाच्या पाण्याने ठिकठिकाणी डबके साचले आहे त्या डबक्यात घाण निर्माण झाली आहे त्यामुळे डासांच्या उत्पत्तीला पोषक असे वातावरण निर्माण झाले परिणामी डासांची संख्या हि दिवसेंदिवस वाढत असून रात्रीच्या वेळी डासांचे थवेच्या थवे नागरिकांच्या घरात घुसतात अश्यातच विज पुरवठाही खंडीत होतो त्यामुळे ग्रामस्थ हैरान झाले आहेत
डबक्यात साचलेल्या पाण्यामुळे गावात ताप, टायफाईडची लागण पसरली असून रुग्णाच्या संख्येत वाढ होत आहे त्यामुळे गावकऱ्यांत भीती व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे ग्रा पं च्या कारभाराविषयी रोष व्यक्त होत आहे ग्रा पं ने गावातील डबके त्वरित बुजवून डास उत्पत्ती प्रतिबंधक फवारणी करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे