विठ्ठलरावपेठा ग्रा.प.अंतर्गत येणाऱ्या गावातील घरे अतिवृष्टीमुळे कोसळले

138

 

संपादक जगदीश वेन्नम/रमेश बामनकर

दखल न्युज नेटवर्क
गुड्डीगुडम:-सिरोंचा तालुक्यातील विठ्ठलरावपेठा ग्राम पंचायत अंतर्गत येणाऱ्या गावातील नागरिकांचे घरे या सततधार अतिवृष्टीमुळे कोसळले असुन या नागरिकांचे आर्थिक नुकसान झालेला आहे.यात अंबिलपू लचुमबाई 20,000,आलम किष्टय्या यांचे 15000,सूनकारी बानय्या यांचे 10,000,पेदापली बाकय्या याचे 20,000,शेंडे तिरुपती यांचे 17,000,
शंकरमा शेट्टी यांचे 10,000 , रमेश गुरुनुले यांचे 15,000,सांबय्या काडरला यांचे 20,000रुपयांचे नुकसान झाले आहे.
या पडझड घराचे पाहणी करून पंचनामा ग्रामविकास अधिकारी श्री.बोदले यांनी केले आहेत.
आठ दिवसापासून सुरू असलेले सततधार पाऊसामुळे यांची घराची पडझड झालेली आहे करिता लोकप्रतिनिधीनी या पडझड घराची पाहणी करून नुकसान भरपाई करून देण्यात यावी अशी मागणी नुकसान ग्रस्त नागरिकांनी केले आहेत.