पञकार विजय केदारे यांच्यावरील हल्ल्याचा पुरोगामी पञकार संघाकडुन निषेध

0
78

 

 

वाशिम- पुरोगामी पत्रकार संघाचे नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष श्री.विजय जगन्नाथ केदारे खेरवाडी, तालुका, निफाड यांनी दैनिक जनमत मराठी मध्ये covid-19 संदर्भात बातमी दिली होती. याचा राग येऊन काही समाजकंटकांनी रात्री त्यांच्या निवासस्थानावर हल्ला चढवला त्याबद्दल पुरोगामी पत्रकार संघाचे वाशिम जिल्हाध्यक्ष फुलचंद भगत यांनी तिव्र निषेध व्यक्त केला असुन त्वरीत त्या हल्लेखोरांना अटक करुन कायदेशिर कारवाई करा अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.संपुर्ण महाराष्टामधुनही या घटनेचा पञकार जाहीर निषेध व्यक्त करत आहेत.पञकारावरील हल्लाप्रकरणी संबंधितावर कडक व कठोर कारवाई व्हावी ,या बाबत प्रशासनाने गांभीर्याने घ्यावे अशी मागणीही पञकारामधुन होत आहे.
महाराष्ट्रात प्रचंड प्रमाणात पत्रकारांवर हल्ले वाढतच आहे,त्यामुळे स्पष्टपणे भूमिका घेवून काम करणे पत्रकारांना अशक्य झाले आहे,हे प्रकार रोकण्यासाठी शासनाने वेळीच शासन करून या गोष्टीला नियंत्रणात आणणे खूप गरजेचे आहे, महोदय, पत्रकार वर हल्ला हा आमचा अस्मितेवर हल्ला आहे,स्वतःच्या जीव धोक्यात घालून पत्रकार जीव ओतून काम करत असतो,त्याची सुरक्षा अत्यंत गरजेचे आहे.वरील प्रकार पुन्हा घडू नये.अशी दखल घेऊन,अज्ञात हल्लखोरांनी जे बेकादेशीर व निंदनीय अशे कृत्य केले ,त्या साठी त्यांना पत्रकार संरक्षण कायदा च्या अंतर्गत दोषींवर कठोर शासन करावे.श्री.विजय जगन्नाथ केदारे यांच्या झालेल्या हल्लाची व मालमत्तेची नुकसानभरपाई आणि वैद्यकीय खर्चाची रक्कमही हल्ले खोर गुन्हेगारानी अदा करावी.व पत्रकारांना न्याय मिळवून देण्यासाठी शासनाने तात्काळ कारवाई करावी.अशी मागणी पुरोगामी पञकार संघाचे वाशिम जिल्हाध्यक्ष फुलचंद भगत यांनी प्रशासनाकडे केली आहे.