वणी शहरातील मोकाट मुक्या जनावरांचा वाली कोन?मुक्त संचारामुळे अपघातात वाढ,नगर पालिकेने बंदोबस्त करण्याची मागणी

132

 

यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी:-विशाल ठोबंरे

शहरातील दिपक चौपाटी, गांधी चौक, टिळक चौक,आंबेडकर चौक यासह मुख्यमार्गावरील ठिक ठिकाणी हे मोकाट जनावरे रसत्याच्या मधोमध बसून असल्यामुळे कितेकदा अपघात सुद्धा झाले आहे. या मोकाट जनावरामुळे शहरातील ट्रॅाफिक जाम होवुन नागरीकांना खुप त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे मोकाट जनावरांवर काही समाजकंटकांकडुन असिड टाकुन जखमी करण्याच्या प्रकारात सुद्धा वाढ होत आहेत.जनावरांच्या मुक्त संचारामुळे जनावरांसह नागरीकांचा अपघात होवुन जिवितहानी होण्याची भिती निर्माण झाली आहे. या जनावरांचा बंदोबस्त करण्यासाढी नगर पालिकेचा कोंडवाडा आहेत.परंतु हा कोंडवाडा कित्तेक दिवसांपासुन बंद आहे.कोंडवाडा सुरु करुन जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरीकांतुन जोर धरत आहे.