मुंडीकोटा येथील दुकाने सुरू करण्यासाठी पंचायतीला व्यापाऱ्यांचा घेराव

121

 

अतित डोंगरे

तिरोडा : मुंडीकोटा हे गाव 1 आगष्ट पासून कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले.
यास आता १६ दिवसांचा कालखंड पूर्ण झालेला आहे.
सर्व कोविड-१९ या विषाणूने बाधीत रुग्ण सुखरूप घरी आलेले आहेत.
यामुळे येथील व्यापारी वर्गाने आपली दुकाने सुरू करण्याचा मागणी ग्राम पंचायत प्रशासन, तलाठी आणि पोलीस चौकी इंचार्ज यांचे समक्ष लावून धरली.
कायदा व सुव्यस्थेच्या दृष्टीने गावात कोविड विषाणूचे पसरणारे प्रादुर्भाव रोखथांब करण्यासाठी जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने मुंडीकोटा कंटेन्मेंट झोन उपविभागीय अधिकारी यांनी वरिष्ठांचे आदेशाचे पालन करून घोषित केले आहे. कंटेन्मेंट झोनचे प्रतिबंधित क्षेत्र हे २८ दिवसांचे असल्याने यात कोणताही बदल गाव स्तरावरून होणे शक्य नाही. करीत आलेले व्यापारी बंधूंना सांगितले असल्याने व्यापाऱ्यांना आल्या पावली परतावे लागले.
उल्लेखनीय असे की, मुंडीकोटा हे ३२ गावांचे व्यापारी केंद्र असल्याने व्यापाऱ्यांनी आपले दुकानात ग्राहकांना जीवनावश्यक सामग्री पोहचवण्यासाठी आणि याच महिन्यात जन्माष्टमी, १५ आगष्ट, पोळा, मारबत, गणेश चतुर्थी सण आल्याचे हेरून दुकानात माल मागवून घेतला आहे. मुंडीकोटा गाव हे कंटेन्मेंट झोन झाल्याने दुकानातील माल तसाच पडून असल्याने मोठ्या समश्याला सामोरे जावे लागत आहे.
गाव पातळीवर समश्येचे समाधान झाले नसल्याने मुंडीकोटा येथील व्यापा-यांचे एक शिष्टमंडळ उपवीभागीय अधिकारी यांना भेटणार आहे. यावर उपविभागीय अधिकारी कोणती भूमिका घेतात. याकडे व्यापाऱ्यांचे लक्ष लागले आहे.