मुंडीकोटा येथील कंटेन्मेंट झोन मध्ये असुविधा

107

 

प्रतिनिधी/अतित डोंगरे दखल न्यूज

तिरोडा : मुंडीकोटा हे कंटेन्मेंट झोन तयार करण्यात आले. त्यामुळे गावात लोकांना बाहेर पडता येऊन नये आणि बाहेरचे नागरिक विनाकारण मुंडीकीत येथे येऊ नये यासाठी मुंडीकोटा येथील बस स्थानक या मुख्य रस्ता, भंबोडी, घोगरा रस्ता येथे तीन चेकपोष्ट लावण्यात आले आहे.
या कंटेन्मेंट झोन चेकपोष्टवर दोन शिक्षक, दोन पोलीस कर्म यांची २४ तास कर्तव्य लावण्यात आले. ते जनतेच्या हिताचे दृष्टीने आपली चोख सेवा देत आहेत.
मात्र या चेकपोष्टवर सुविधा नाही. पावसाचे दिवस असल्याने तयार करण्यात आलेली झुगी मोकळी असल्याने येथे कर्तव्य बजावणे गैरसोयीचे झाले आहे. आजू बाजूला सर्वत्र कचरा आहे. यामुळे सरपटणाऱ्या जिवांचा धोका आहे. विंचू, मेहंदल, साप ही नित्याची बाब झालेली आहे. पावसाची सुरुवात होतांनी झोपडी गळू लागते. त्यामुळे कर्तव्यावर असलेल्यांना ओले व्हावे लागते. जीव मुठीत घेऊन कर्तव्य बजावावी लागत आलेत. करीता होत असलेल्या गैरसोयीची व्यस्था करण्यात यावी. अशी मागणी कर्तव्य बजावणाऱ्यांनी केली आहे.