न्युज इफेक्ट बातमी प्रसारीत होताच न.प.कर्मचार्‍यांना आली जाग,वार्डातील मृत जनावर उचलले,अनिल गावंडे यांच्या पाठपुराव्याला यश

0
61

 

मंगरुळपीर-शहरातील १ नंबर वार्डात मृत जनावर कालपासुन पडुन असल्याने कुञे त्या जनावराचे लचके तोडत आहेत,परिसरात दुर्गंधीहीही पसरली असुन रोगराईची भिती आहे अशी बातमी प्रसारीत करताच येथील न.प.च्या आरोग्य विभागाला जाग आली आणी त्यांनी तात्काळ ते मृत जनावर ऊचलुन नेले.यासाठी नगरसेवक अनिल गावंडे यांनीही पाठपुरावा केला.
मंगरुळपीर शहरासह तालुक्यातही कोरोना रुग्न झपाट्याने वाढत असुन सर्वञ भितिचे वातावरण निर्माण झाले आहे.अशातच मंगरुळपीर शहरातील वार्ड क्र.१ मध्येही कोरोना रूग्न आढळल्याने सबंधित परिसर सिल केला परंतु तिथेच एक गाय मृत अवस्थेत पडलेली असुन नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाला येथील भाजपाचे नगरसेवक अनिल गावंडे यांनी कळवले होते परंतु त्या मृत जनावराला तिथुन हलवन्यात आले नव्हते.शेवटी त्या जनावरांचे कुञ्यांनी लचके तोडायला सुरुवात केली आणी परिसरात दुर्गंधी पसरली आहे.आधिच कोरोनाची भिती आणी त्यात ही दुर्गंधी त्यामुळे परिसरात आजार पसरन्याची भिती असल्याने न.प.प्रशासनाने तात्काळ या प्रकरणाची दखल घ्यावी अशी मागणी नगरसेवक अनिल गावंडेसह वार्डातील नागरीकांनी केली होती.याविषयी बातमी प्रसारीत होताच न.प.प्रशासनाने घटनास्थळी जावुन ते मृत जनावर ऊचलुन नेले.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206