मंगरुळपीर येथील कोरोना रुग्नाच्या घराजवळच मृत जनावर,न.प.आरोग्य विभाग सुस्त,रोगराईची भिती

120

 

मंगरुळपीर-मंगरुळपीर शहरासह तालुक्यातही कोरोना रुग्न झपाट्याने वाढत असुन सर्वञ भितिचे वातावरण निर्माण झाले आहे.अशातच मंगरुळपीर शहरातील वार्ड क्र.१ मध्येही कोरोना रूग्न आढळल्याने सबंधित परिसर सिल केला परंतु तिथेच एक गाय मृत अवस्थेत पडलेली असुन नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाला येथील भाजपाचे नगरसेवक अनिल गावंडे यांनी कळवले सुध्दा परंतु त्या मृत जनावराला तिथुन हलवन्यात आले नाही.शेवटी त्या जनावरांचे कुञ्यांनी लचके तोडायला सुरुवात केली असुन परिसरात दुर्गंधी पसरली आहे.आधिच कोरोनाची भिती आणी त्यात ही दुर्गंधी त्यामुळे परिसरात आजार पसरन्याची भिती असल्याने न.प.प्रशासनाने तात्काळ या प्रकरणाची दखल घ्यावी अशी मागणी नगरसेवक अनिल गावंडेसह वार्डातील नागरीकांनी केली आहे.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206