विपरीत परीस्थीतीतही बुलडाणा जिल्हयातील विद्यार्थी उत्तुंग यश मिळवु शकतात हे दिसुन आले – ना.वर्षाताई गायकवाड

0
96

 

चिखली: बुलडाणा जिल्हा हा गुणवंताची खानच असुन या जिल्हयाने यापुर्वीही अनेक गुणवंत महाराष्ट्राला दिले आहेत. म्हणायला मागास भागात या जिल्हयाची गणना आजवर केली जात होती. परंतु शिक्षणाच्या क्षेत्रात मात्र हा जिल्हा प्रगत असल्याचे दिसुन येते. जिवनात शासकीय शाळेत शिक्षण घेवुन व आय.ए.एस. पर्यंतचा प्रवास करे पर्यंत 1200 रूपयाचा मोबाईल फोन बाळगणारे आणी आय.ए.एस. झाल्यावर स्मार्ट फोन बाळगणारे आय.ए.एस. परिक्षा उत्तीर्ण विशाल नरवाडे, अभिजीत सरकटे व उपजिल्हाधिकारी पदी निवड झालेले एकनाथ बंगाळे आणी इयत्ता 10 वी 12 वी मधील गुणवंत विद्याथ्यांचा सत्कार करण्याचा योग या बुलडाणा जिल्हयातच मिळाला, ही जिल्हयासाठी अभिमानाची बाब होय. आणी ग्रामीण भागातील असे हे विखुरलेले मोती जमा करून त्यांचा यथायोग्य सन्मान गुणवंत विद्यार्थीचा सत्कार सभारंभातुन होतो ही आनंदाचीच बाब म्हणावी लागले. जिल्हा काॅग्रेस कमिटी नेहमीच राबवित आलेल्या या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजनाच्या कल्पकतेचे कौतुक केल्या शिवाय राहवत नाही असे उद््गार राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री नामदार वर्षाताई गायकवाड यांनी काढले. त्या जिल्हा काॅग्रेस कमिटीच्या वतीने चिखली येथे परंमहंस रामकृष्ण मौनीबाबा संस्थानचे सभागृहात आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमात बोलत होत्या.
याप्रसंगी जिल्हयातील आय.ए.एस. ही परिक्षा उत्तीर्ण झालेल्या तसेच वर्ग10 वी 12 परीक्षेमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी जिल्हा काॅग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुलभाउ बोंद्रे हे होते तर कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. मनिषाताई पवार, प्रदेश सचिटणीस श्यामभाउ उमाळकर, आमदार राजेश एकडे, माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा, रेखाताई खेडेकर, जि.प.सभाती सौ. ज्योतीताई पडघान, डाॅ. स्वातीताई वाकेकर, प्रकाश पाटील, जिल्हा उपाध्यक्ष शैलेश सावजी, अनंत वानखेडे, ज्ञानेश्वर दादा पाटील, युवक काॅगे्रसचे मनोज कायंदे, रामविजय बुरूगले, सभापती उषाताई चाट, बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर सुरूशे, उपसभापी राजीव जावळेे यांची प्रमुख उपस्थिीती होती.
याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात बोलतांना राहुलभाउ बोंद्रे यांनी बुलडाणा जिल्ह्यातील दिनदलीत, गोरगरीब, वंचित व उपक्षीत कष्टकरी शेतकरी शेतमजुरांच्या मुलांना योग्य प्रकारचे शिक्षण मिळुन जगाच्या स्पर्धेत त्यांचा टिकाव लागावा यासाठी दर्जेदार शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात अशी अपेक्षा असुन अशा विपरीत परिस्थीत जे साधन सामृग्रीचा आभाव असतांनाही ग्राम सावळी येथील विशाल नरवाडे, दरेगांव येथील एकनाथ बंगाळे अशा दुर्गम भागातील युवकांनी आय.ए.एस. आणी उपजिल्हाधिकारी अशा पदावर आपला दावा पक्का केला, त्याचबरोबर शेगांव येथील अभिजीत सरकटे यांनी सुध्दा मातंग समाजातुन विदर्भातुन सर्वप्रथम आय.ए.एस होण्याचा बहुमान पटकावला तसेच इतरही विद्यार्थी यशस्वी व्हावे म्हणुन त्यांचा सत्कार दरवर्षी आयोजित केला जातो असे स्पष्ट केले.

सत्काराला उत्तर देतांना विशाल नरवाडे आय.ए.एस. यांनी उपस्थिीतांना आपले संपुर्ण शिक्षण शासकीय शाळांमधुन झाले अभिमानाने सांगित आपल्या यशाची गुपीते उघड करून दाखवितांनाच कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी व ज्यांच्या हस्ते सत्कार संपन्न झाला त्या नामदार वर्षाताई गायकवाड यांनीही मुंबईतील धारावी मध्ये कोवीड विरोधात जो पॅर्टन राबविला व कोरोनाला आळा घालण्याचा प्रयत्न केला त्याचे अभिमान वाटल्याचे स्पष्ट केले. या कार्यक्रमाला कोरोनामुळे मोजकीच उपस्थिीती होती व त्यातही कोरोना लक्षात घेता सोशल डिस्टगसिंगचे पालक करण्यात आले होते. व्यस्त काय्रक्रमामुळे नामदार वर्षाताई गायकवाड उशिरा कार्यक्रम स्थळी दाखल झाल्या तरी त्यांनी त्यांचे सर्व नियोजित कार्यक्रम पार पाडले. यावेळी जि.प.अध्यक्षा सौ. मनषिाताई पवार, माजी आमदार रेखाताई खेडेकर, दिलीपकुमार सानंदा, व प्रदेश सरचिटणीस श्यामभाउ उमाळकर,यांचीही समायोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे संचलन सुनिल सपकाळ यांनी केले. तर अभार प्रर्दशन प्रा. विजय लहाने यांनी केले.
गुणवंताच्या सत्कार समारंभा नंतर शासकीय विश्राम गृहावर नामदार वर्षाताई गायकवाड यांनी कोरोनाच्या पाश्वभुमीवर शिक्षण क्षेत्रात येत असलेल्या अडचणी व त्यावर करावयाच्या उपाय योजना या संदर्भात जिल्हयातील शिक्षण क्षेत्रातील अधिकारी याची आढावा बैठक घेवुन त्यांच्या समस्या जाणुन घेवुन त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले. यावेळी माध्यमीक विभागाचे शिक्षणाधिकारी श्रीराम पानझाडे, व गटशिक्षण अधिकारी श्री शिंदे व इतर अधिकारी हजर होते.