Home गडचिरोली गुड्डीगुडम येथे भ्रमणध्वनी मनोरा उभारण्यात यावा…

गुड्डीगुडम येथे भ्रमणध्वनी मनोरा उभारण्यात यावा…

134

 

गुड्डीगुडम ग्रामीण प्रतिनिधी/रमेश बामनकर

दखल न्युज नेटवर्क
गुड्डीगुडम:-अहेरी तालुक्यातील गुड्डीगुडम हे गाव या परिसरातील मध्यवर्ती ठिकाण आहे
या परिसरात सरकारी किंवा अन्य कंपनीचे कोणत्याही प्रकारचे भ्रमणध्वनी मनोरा नसल्याने या भागातील ८ ते १० गावांत नेटवर्क ची सुविधा नाही.
आज संपुर्ण देशात डिजिटल इंडियाचे वारे वाहत असताना मात्र ग्रामीण भागात नेटवर्क च्या असुविधेमुळे होणाऱ्या गैरसोयीमुळे या परिसरातील नागरिकांनी शासनाप्रती तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत.
गुड्डीगुडम परिसरात तिमरम,निमलगुडम, झिमेला, नंदीगाव, गुड्डीगुडम, नंदीगाव टोला, काटेपली, इत्यादी गावे आहेत.गुड्डीगुडम येथे शासकीय माध्य.आश्रम शाळा, ग्राम पंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय, पशुधन दवाखाना, आरोग्य उपकेंद्र, कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालय, जि.प.शाळा. वन व्यव.समिती कार्यालय,तसेच उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत.
आजच्या घडीला शिक्षण प्रणाली व शासकीय प्रणाली ऑनलाईन पध्दतीने कार्य सुरू आहे.या परिसरातील जनता टांगती तलवारी प्रमाणे आहेत.
आज प्रत्येक कार्यालयात आँनलाईन पध्दतीने दाखले किंवा शेतकऱ्यांना सातबारा, नकाशा, आठ-अ,असे अनेक दाखले व शासकीय कामे आँनलाईन पध्दतीने केल्या जात आहेत तसेच मोबाईल संच हे खेळण्या बनले आहेत .
या परिसरातील जनता नेटवर्क अभावी अहेरी सारख्या नगरामध्ये जाऊन कामे करावी लागत आहे या साठी आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
करिता लोकप्रतिनिधीनी या समस्या कडे लक्ष वेधून गुड्डीगुडम या परिसरात भ्रमणध्वनी मनोरा उभारण्यात यावा अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी व युवकांनी करीत आहेत.

Previous articleसंगीत शिक्षक राहूल सपाटे राज्यस्तरीय कलारत्न पुरस्काराने सन्मानित
Next articleविपरीत परीस्थीतीतही बुलडाणा जिल्हयातील विद्यार्थी उत्तुंग यश मिळवु शकतात हे दिसुन आले – ना.वर्षाताई गायकवाड