संगीत शिक्षक राहूल सपाटे राज्यस्तरीय कलारत्न पुरस्काराने सन्मानित

0
279

 

पंकज चहांदे
तालुका प्रतिनिधी
देसाईगंज/वडसा
दखल न्यूज भारत

आमगाव – देसाईगंज तालुक्यातील आमगाव येथील रहिवासी आणि दत्तकृपा संगीत विद्यालय देसाईगंज (वडसा) चे प्रसिद्ध संगीत शिक्षक राहूल सपाटे यांना उल्लेखनीय सांगीतिक कार्याबद्दल मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई द्वारा, राज्यस्तरीय गुणिजन गौरव महासंमेलन २०२० करिता गडचिरोली जिल्ह्यातून निवड होऊन, आज दिनांक १६ ऑगस्ट २०२० रोजी ऑनलाईन पुरस्कार वितरण कार्यक्रमातुन “राज्यस्तरीय कलारत्न पुरस्कार २०२०” प्रदान करून गौरवण्यात आले. या आधी त्यांना शालेय विविध पुरस्कारापासून ते “युवा संगीत भूषण” आणि “कुणबी समाज कला गौरव” पुरस्कार ही मिळाले आहेत. त्यांनी आज पर्यंत बऱ्याच कार्यक्रमातून आपल्या कलेची छाप पाडलेली आहे. भजन गायन, सुफी कव्वाली गायन, संगीत नाटकात अभिनय आणि संगीत दिग्दर्शन असो किंवा सांस्कृतीक कार्यक्रमाचे परीक्षण, भजन स्पर्धेचे परीक्षण असो नव्या पिढीतील तज्ञ माणुस “सपाटे सर” असा मानाने परिसरात त्यांच्या विषयी उल्लेख केला जातो. ते संगीत विशारद आणि एम.ए.संगीत फर्स्ट क्लास मध्ये पास असून त्यांना संगीत कला बरोबर काव्य लेखन, चित्रकला, पेंटिंग मूर्तिकला, अभिनय कला अवगत आहेत. त्यांनी शासकीय उपक्रमातूनही बरीच प्रशस्ती पत्र मिळवलेली आहेत. या संपूर्ण त्यांच्या कार्याची दखल घेत मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई द्वारा गडचिरोली जिल्ह्यातून पुरस्कारासाठी निवड करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.