आजच्या २६ नव्या रुग्णांसह बाधितांची संख्या ८१० वर पोहचली २९ रुग्ण कोरोनामुक्त

सचिन श्यामकुंवर तालुका प्रतिनिधी दखल न्यूज भारत
गोंदिया दि.१६ कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असल्यामुळे जिल्ह्यात सातत्याने रुग्ण देखील वाढत आहे. आज प्रयोगशाळेतून प्राप्त अहवालातून २६ जणांना बाधा झाल्याचे निदान झाले तर २८ रुग्ण कोरोनावर मात करुन आज घरी परतले.

आज २६ रुग्ण जे कोरोना बाधित आढळून आले आहे.त्यामध्ये गोंदिया तालुक्यातील १७ रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये गोंदिया येथील लोहालाईन -६,छिपिया/कामठा -१,नीलागोंदी-१,सिव्हिल लाईन गोंदिया-२,गणेशनगर-१,शास्त्री वार्ड-१,हरिकाशीनगर-३, कारंजा-१, कटंगीकला-१.तीन रुग्ण आमगाव तालुक्यातील आहे यामध्ये बनगाव, आमगाव व तुकडोजी चौक येथील प्रत्येकी एक रुग्ण.तिरोडा तालुक्यातील बिरसी व शास्त्री वार्ड येथील प्रत्येकी एक रुग्ण आणि चार रुग्ण हे सडक/अर्जुनी येथील आहेत.

कोरोना बाधित वाढत्या रुग्ण संख्येमुळे जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ८१० झाली आहे. यामध्ये प्रयोगशाळा चाचणीतून ६५९ रॅपिड ॲन्टीजन चाचणीतून १४६ आणि ५ रुग्ण बाहेर जिल्हा व बाहेर राज्यात आढळले आहे. जिल्ह्यातील एकूण क्रियाशील रुग्णांची संख्या २७६ वर पोहोचली आहे.

ज्या रुग्णांनी कोरोनावर आज मात केली अशा रुग्णांची संख्या २८ आहे. यामध्ये गोंदिया तालुक्यातील सहा रुग्ण आहे गोंदियातील शास्त्री वार्ड, सिव्हिल लाईन,दवनीवाडा,पुनाटोली कुडवा,व गोंदिया येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे. सडक/अर्जुनी तालुक्यातील सौंदड आणि मुंडीपार येथील प्रत्येकी एक रुग्ण,सडक/अर्जुनी तालुक्यातील नवेगावबांध येथील पाच रुग्ण.तिरोडा तालुक्यातील ११ रुग्ण असून यामध्ये मुंडिकोटा, बिरसी,पुराणी पोवार कॉलनी, शंकरनगर, गांधीवार्ड, प्रगतीनगर, खुर्शिपार ,तुमसर, खैरलांजी येथील प्रत्येकी एक रुग्ण आणि दोन रुग्ण हे महात्मा फुले वार्डातील आहे. सालेकसा तालुक्यातील तीन रुग्ण असून सालेकसा,तेढा व बिजेपार येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे. आतापर्यंत एकूण ४९४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

गोंदिया येथील विषाणू चाचणी प्रयोगशाळेत तपासणीसाठी एकूण१२७५० नमुने पाठविण्यात आले. यामध्ये ११७३६ नमुने निगेटिव्ह आले. तर ६५९ नमुने पॉझिटिव्ह आढळून आहे. ४१ नमुन्यांच्या अहवाल प्रलंबित असून ३१३ नमुन्यांच्या अहवालाबाबत अनिश्चितता आहे.

विविध संस्थात्मक विलगिकरण कक्षात १९८ व्यक्ती आणि गृह विलगिकरणात ८५७ व्यक्ती अशा एकूण १०५५ व्यक्ती विलगिकरणात आहेत. हया सर्व व्यक्ती प्रशासनाच्या देखरेखीखाली असून आरोग्य विभागाचे कर्मचारी त्यांची नियमीत आरोग्य तपासणी करून त्यांच्यावर उपचार करीत आहे.

कोरोना बाधित रुग्णांचा तात्काळ शोध रॅपिड अँटीजेन टेस्टच्या माध्यमातून घेण्यात येत आहे. जिल्ह्यात ७०२२ व्यक्तींचे नमुने घेण्यात आले. यामध्ये ६८७६ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले. १४६ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात २४२ चमू आणि १४० सुपरवायझर १२६ कॅटेंटमेंट क्षेत्रासाठी नियुक्त केले असून ज्या गावात आणि नगरपालिका/नगरपंचायत क्षेत्रात कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे तो भाग कंटेंटमेंट क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येत आहे.

क्रियाशील कॅटेंटमेंट क्षेत्र १२६ झाले असून यामध्ये गोंदिया तालुक्यात चांदणीटोला,कुडवा व गोंदिया शहरातील यादव चौक, रेलटोली, रेल्वे लाईन, श्रीनगर, शास्त्री वार्ड,संगम बिल्डींग गल्ली, क्षत्रिय मार्ग श्रीनगर, सिंधी कॉलोनी, शास्त्री वार्ड क्र.२., रामाटोला-२, कुंभारटोली व लक्ष्मी राईस मिल परिसर. सालेकसा तालुक्यातील भजेपार,सीतेपार, झालिया, धानोली, तिरखेडी, केहारीटोला, गोरे, शारदानगर, आमगाव/खुर्द, सिंगलटोली, न्यू पोलीस कॉलनी, गिरोला, पोहारीटोला व बापुटोला. देवरी तालुक्यातील भागी,गरवारटोली व नवाटोला, देवरी शहरातील वार्ड क्रमांक ५,७,९,१०, १५,१६ आणि १७, सडक/अर्जुनी तालुक्यातील कोलारगाव, हलबीटोला, डव्वा, मुंडीपार, सडक/अर्जुनी येथील वार्ड क्र.१४ व १७ सौंदड येथील गांधी वार्ड, कोहळीटोला,रेंगेपार,खाडीपार व मडीटोला.आमगाव तालुक्यातील किंडगीपार, तिगाव, चिरचाळबांध, बनगाव, डोंगरगाव, पदमपूर-१, पदमपूर-२, रिसामा, कुंभारटोली, शिवनटोली, रिसामा-२, आमगाव शहरातील भवभूती वार्ड, वार्ड क्र.३ व ४, फ्रेन्ड्स कॉलनी, रिसामा वार्ड क्र.५ चा समावेश आहे.

तिरोडा तालुक्यातील बिरसी १ व २ वडेगाव,मुंडीकोटा,सतोना,लाखेगाव,माली,लोणार,खैरबोडी,गुमाधावडा,वडेगाव-२,गोंडमोहाडी,पाटीलटोला, खडकी, काचेवानी, मेंढा, मलपुरी, गराडा,इसापूर,सेजगाव,पालडोंगरी, पिपरिया,खुर्शीपार,उमरी,पांजरा, सरांडी बाजार चौक, घोघरा, सरांडी, घोघरा-२, मुंडीकोटा रेल्वे स्टेशन, खोलगाव, सालेबर्डी, खैरलांजी, न्यू बेलाटी/खुर्द, बेलाटी/खुर्द-२, मुंडीकोटा बाजार चौक, सरांडी-२, सर्रा, कवलेवाडा, बयाबाब(मुंडीकोटा), तिरोडा शहरातील न्यू सुभाष वार्ड, नेहरू वार्ड, महात्मा गांधी वार्ड, लक्ष्मी वार्ड, रविदास वार्ड, शहिद मिश्रा वार्ड, महात्मा फुले वार्ड, लक्ष्मीनगर, प्रगतीनगर, किल्ला वार्ड, मुस्लीम टोली व रामनगर आदीचा समावेश आहे. अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील भिवखिडकी, सिंगलटोली, ताडगाव व वडेगाव आणि गोरेगाव तालुक्यातील कलपाथरी, पिंडकेपार, तेढा व तुमखेडा आदींचा समावेश आहे.