अकोट तालुक्यात पोळा सणावर कोरोनाचे सावट यंदाचा पोळा घरीच साजरा करा

101

 

अकोट शहर प्रतिनिधी
स्वप्नील सरकटे

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे अकोट तालुक्यात बैल पोळा आणि तान्हा पोळा भरणार नाही भरणार नसल्याने तो घरीच साजरा करावा लागणार आहे . वर्षभर शेतकरी पोळा सणाची वाट बघत असतो मात्र या वर्षी कोरोना आजाराचा वाढता पादुर्भाव बघता पोळा सार्वजनिक रित्या साजरा होणार नसल्याने शेतकर्यांमध्ये नाराजीचा सुर आहे. रोजच कोरोनाचा आकडा वाढत असल्याने बैल पोळा आणि तान्हा पोळा या दोन्ही वर बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात तसे आदेश जारी केले आहेत.
भारत हा कृषिप्रधान देश असून बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून हा विशेषतः विदर्भात भव्य पातळीवर साजरा केला जातो.
शेतकरी या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो. शेतकर्‍यांचा सखा, मित्र सर्जा-राजाचा आजचा दिवस मानाचा असतो. पोळ्याच्या दिवशी बैलाला गाडीला अथवा नांगराला जुंपले जात नाही तर त्याचे पूजन केले जाते. पोळ्याच्या पहाटे शेतकरी आपल्या बैलांना नदीवर नेऊन त्यांची आंघोळ घालतो. तर्‍हे तरहने सजविण्यात येते. ग्रामीण भागात हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. अकोल्या जिल्ह्यासह अकोट ताललुक्यात सध्या कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. येत्या १८ ऑगस्ट रोजी पोळा आहे तर १९ ऑगस्टला तान्हा पोळा आहे. हा सण सार्वजनिक रीत्या साजरा झाल्यास कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने बैल पोळा व तान्हा पोळा सार्वजनिकरीत्या साजरा करण्यास प्रतिबंध घातला आहे. हा सण वैयक्तिकरीत्या घरी साजरा करा. असे आवाहन जिल्हाधिकारी पापळकर साहेब व अकोट ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार ज्ञानोबा फड यांनी केले आहे.