Home गडचिरोली गडअहेरी नाल्याला पूर,अहेरी तालुक्यातील जवळपास 20 गावांचा तुटला संपर्क… नूतन पुलाचे...

गडअहेरी नाल्याला पूर,अहेरी तालुक्यातील जवळपास 20 गावांचा तुटला संपर्क… नूतन पुलाचे बांधकाम अर्धवट

141

 

प्रतिनिधी/रमेश बामनकर

गुड्डीगुडम:- तालुक्यातील देवलमरी रस्त्यावर असलेल्या गडअहेरी नाल्याला पूर आल्याने अहेरी तालुक्यातील जवळपास 20 गावांचा संपर्क तुटला आहे.

अहेरी ते देवलमरी रस्त्यावर गडअहेरी नाल्यावर ठेंगणा आणि खूप जुना पूल असल्याने दरवर्षी पावसाळ्यात या नाल्यावरील पूल पाण्याखाली गेल्याने रहदारी ठप्प होतो.त्यामुळे तीन ते चार दिवस हा मार्ग बंद राहतो.त्यामुळे या भागातील लोकांना सन्ड्रा-आलापल्ली-अहेरी असा प्रवास करून तालुका मुख्यालय गाठावे लागते.

अहेरी उपविभागात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सर्व नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहे.अहेरी तालुक्यात गडअहेरी नाल्यावर पाणी वाढल्याने सध्या रहदारी बंद आहे.ही परिस्थिती दरवर्षी असते म्हणून तत्कालीन आमदार व माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी या पुलाच्या मंजुरी साठी शासनदरबारी पाठपुरावा केले आणि मंजुरी मिळविली व
या नाल्यावर पुलाचे बांधकाम सुरू आहे.मात्र,काम पूर्ण न झाल्याने यावर्षी सुद्धा लोकांना फटका बसत आहे.नूतन पुलाचे काम पूर्ण झाल्यास ही अडचण दूर होणार आहे.मात्र,सध्यातरी या भागातील लोकांना पूरपरिस्थितीचा फटका सहन करावाच लागणार आहे.

संततधार पावसामुळे या परिसरातील नदी-नाले तुडुंब भरून वाहत असल्याने लोकांनी सतर्कता बाळगावी,पुलावरून पाणी वाहत असताना नदी-नाले ओलांडू नये असे आवाहन अहेरीचे तहसीलदार ओंकार ओतारी यांनी केले आहे.

Previous articleराष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनि, वृक्षांना राख्या बांधून दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश
Next articleअकोट तालुक्यात पोळा सणावर कोरोनाचे सावट यंदाचा पोळा घरीच साजरा करा