राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनि, वृक्षांना राख्या बांधून दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश

108

प्रतिनिधी:रोहन आदेवार

वणी: वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” हा जगतगुरु संत तुकाराम महाराज यांचा अभंग वृक्ष व मानव यांचे नाते अधोरेखित करतो. भारतीय संस्कृतीत महत्वाचा मानला जात असलेला राखी पौर्णीमेचा सण देशात मोठ्या उत्साहाने  साजरा केला जातो.

स्वतंत्र दिनाच्या पर्वावर लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी येथील राष्ट्रिय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी, ” वृक्ष संवर्धनाच्या” विचाराने प्रेरित होऊन, वृक्षा ला राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. आणि त्या सर्व वृक्षाच्या संवर्धनाची जबाबदारी घेतली. या सर्व प्रक्रियेला प्रेरित करण्यासाठी आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविण्यासाठी लोकमान्य टिळक महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे सर , प्रा.डॉ. अभिजीत अणे व राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. निलिमा दवणे, प्रा. किशन घोगरे, आणि महाविद्यालयतील सर्व प्राध्यापक बंधू भगिनी च्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.