खळबळजनक घटना, राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याप्रकरणी मारेगावात ग्रा.पं.च्या प्रशासकावर गुन्हा दाखल, मारेगाव तालुक्यातील बोटोनी येथील घटना

 

यवतमाळ/ रोहन आदेवार

स्वातंत्र दिनाच्या पर्वावर यवतमाळ जिल्ह्यात मारेगाव तालुक्यातील चि. बोटोनी येथे ग्राम पंचायत कार्यालयात ध्वजारोहन प्रसंगी प्रशासकाचे नजरचुकीने राष्ट्रध्वज फडकविताना फाटल्या प्रकरणी मारेगावात गुन्हा दाखल करन्यात आला आहे.
ग्रा.प.चि. बोटोनी येथील कार्यालयात देशाचा व राष्ट्रध्वजाचा अपमान झाल्याची तक्रार फिर्यादी भाष्कर हुसेन सिडाम (55) रा.बोटोनी यांनी मारेगाव पोलिसात केल्याने ग्रा.प.प्रशासक तथा मारेगाव पंचायत समिती चे विस्तार अधिकारी प्रल्हाद मारोती पंडित (45) यांचेवर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला.
फिर्यादी यांचे बयांनानुसार फिर्यादी भाष्कर सिडाम हे 15 ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत च्या आरओ प्लांट वर पिण्याचे पाण्या करिता 7.30 वाजता दरम्यान गेले असता, ग्रा.पं.मध्ये ध्वजारोहनाचा कार्यक्रम ग्रा.पं.चे माजी सरपंच उपसरपंच, सदस्य आशा वर्कर तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक यांचे उपस्तीतीत चालू होता. दरम्यान ग्रा.प.चे प्रशासक असलेले मारेगाव पं.स.चे विस्तार अधिकारी प्रल्हाद पंडीत यांचे हस्ते ध्वजारोहण होत असतांना दोरीला झटका मारला असता राष्ट्रध्वज फाटला. दरम्यान ग्रा.पं. चा कर्मचारी शरद डाहुले हा झेंडयाच्या खांबावर चढून झेंड्याची गाट सोडून राष्ट्रध्वज खाली उतरवून त्यानंतर बद्दलवण्यात आला व ध्वजारोहण करण्यात आले.
या अपमानास्पद प्रकरणाची तक्रार मारेगाव पोलिसात करण्यात आली. फिर्यादीच्या तक्रारीवरून प्रशासक प्रल्हाद पंडित ह्याच्यावर पोलिसांनी ध्वजाचा अवमान केल्या प्रकरणी 195/20 कलम 2,3 (A) राष्ट्रीय सन्मानाचा अप्रतिष्ठस्थेस प्रतिबंध अधिनियम 1971 सह कलम 5 भारतीय ध्वज संहिता भाग 2 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.पुढील तपास पो.नि. जगदिश मंडलवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उप.नि.अमोल चौधरी करीत आहे.