अकोट ग्रामीण पोलिसचे ठाणेदार ज्ञानोबा फड यांचे नागरिकांना आव्हान

108

 

अकोट शहर प्रतिनिधी
स्वप्नील सरकटे
सद्या कोविड – 19 या आजाराचा मोठ्या प्रमाणात देशात,राज्यात,जिल्ह्यात,तालुक्यात पादुर्भाव चालू असुन त्यामूळे शासनाने कोणतेही धार्मिक,सामाजिक,सार्वजनिक,कार्यक्रम करण्यास बंदी घालून एकत्र जमण्यास बंदी घातली आहे.सद्या पोळा,पोळ्याची कर येत असुन सर्व सार्वजनिक उस्तव साजरे करण्यास मा.जिल्हादंडाधिकारी साहेब अकोला यांचे आदेशानुसार संचारबंदी लागू करण्यात आली असुन तसेच जमाव बंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे.तरी आपले गावात सालाबादप्रमाणे पोळा हा सण एकत्र न भरवीता,शेतकर्यांनि बैलाचा पोळा हा सण न भरवीता,बैलांची पुजा आप आपले घरीच करावी.अशी गावात दवंडी देवून जनतेस माहिती द्यावी व गावात कोणीही सार्वजनिक पोळा हा सण साजरा करणार नाही.जर गावात कोणीही सार्वजनिक पोळा हा सार्वजनिक ठिकाणी साजरा केल्यास त्यांचे विरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा,साथ रोग प्रतिबंधक कायदा व भांदवि कायदया प्रमाणे कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल याची दक्षता घ्यावी.असे आवाहन ठाणेदार ज्ञानोबा फड यांनी केले आहे.