महात्मा फुले कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागात शेतकऱ्यांना शेती संदर्भात जनजागृतीचा कार्यक्रम आयोजित केला होता.

125

 

इंदापूर तालुका प्रतिनिधी दिनांक 16 बाळासाहेब सुतार,

– महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित, रत्नाई कृषि महाविद्यालय,अकलूज अंतर्गत कृषि दुतांनी पिंपरी बु। (ता. इंदापूर) येथे ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांतर्गत कृषिदूत विशाल वर्धमान बोडके याने शेतकऱ्यांना माती परिक्षणाचे महत्व सांगून मातीचे नमुने घेण्याचे प्रात्यक्षिक सादर केले.

रासायनिक खतांचा वाढता वापर, पिकांची फेरपालट याचा अभाव, मातीमधील रासायनिक घटकांचे वाढते प्रमाण, जैविक खतांचा अपुरा वापर यामुळे जमिनीची सुपीकता कमी होत चालली आहे. परिणामी शेतकऱ्यांचे उत्पन्न देखील कमी होते. यासाठी माती परीक्षण करून मातीमधील मूलद्रव्यांची पातळी तपासून त्याच्या अहवालनुसार खत मात्रा देणे फायदेशीर ठरते असे यावेळी सांगण्यात आले.

यासाठी शि. प्र. मंडळ अकलूजचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील, महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. डी. पी. कोरटकर, प्राचार्य आर. जे. नलावडे कार्यक्रम समन्वयक प्राध्यापक एस. एम, एकतपुरे,

कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक एस. आर. अडत, प्राध्यापक डी. एस. मेटकरी यांचे मार्गदर्शन लाभले.

Balasaheb Sutar
Reporter
Mob.9850628160