Home अकोला भाजपच्या भ्रष्टाचार विरोधात वंचितचे आंदोलन रस्त्यावर साचलेल्या पाण्यात कमळ लावून नोंदविला...

भाजपच्या भ्रष्टाचार विरोधात वंचितचे आंदोलन रस्त्यावर साचलेल्या पाण्यात कमळ लावून नोंदविला निषेध

138

 

अकोट शहर प्रतिनिधी
स्वप्नीलसरकटे

अकोला महानगरातील रस्त्याची प्रचंड दुरावस्था झालेली आहे.महापालिकेतील भाजपचे सत्ताधारी पदाधिकारी व जनप्रतिनिधी यांच्या संगनमताने राजरोस भ्रष्ट्राचार सूरु आहे. रस्त्यावर पडलेले खड्डे व नागरिकांना होणारा त्रास यांच्या विरोधात आज वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्हा – महानगर, महिला आघाडी, सम्यक विध्यार्थी आंदोलन व युवक आघाडी यांनी रविवार तसेच लॉकडाऊन असताना ही रस्त्यावर उतरुन आंदोलन केले. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात कमळाची फुले सोडून भाजपचा निषेध नोंदविला गेला. रस्त्याच्या कामातील भ्रष्टाचाराची चौकशी करावी या मागणीसाठी तब्बल अकरा ठिकाणी वेगवेगळ्या रस्त्यावर वंचितने आंदोलन केले.
निशांत टॉवर समोरील अंडरपास येथील साचलेल्या पाण्यात
प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, दिपक गवई, सुरेंद्र तेलगोटे, सम्राट सुरवाडे, रामाभाऊ तायडे, गजानन गवई, सचिन शिराळे, विकास सदांशीव, सचिन शिरसाट, संदिप शिरसाट, नितीन सपकाळ,निकि डोंगरे, शुभम पातोडे यांनी आंदोलन केले.वंचित बहुजन आघाडी अकोला महानगर पूर्वच्यावतीने जठरपेठ चौक ते उमरि आंदोलन करण्यात आले यावेळी अकोला महानगर अध्यक्ष शंकरराव इंगळे , जीवन डीगे, निखिल बोरीकर, मनोहर बनसोड , गुरुदेव पलासपागर, शरद इंगोले, डॉ मेश्राम, शुभम डहाके, वैभव देशमुख, सचिन शिरसाट अँड आकाश भगत आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने टॉवर चौक व अशोक वाटिका येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी अकोला जिल्हा महासचिव प्रतुल विरघट, धिरज इंगळे, संघटक आकाश गवई, प्रसिद्धी प्रमुख पवन गवई, प्रवक्ता विशाल नंदागवळी, उपाध्यक्ष आदित्य बावनगडे, सुमित भांबोरे, अॅड.भुषण घनबहादुर,राहुल इंगळे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
युवक आघाडीच्यावतीने पंचायत समिती समोर आंदोलन करण्यात आले. यावेळी पश्चिम शहर अध्यक्ष आशिष मांगुळकर,रवी उमाळे ,सागर तायड़े, संदीप सिरसाट, नितिन सपकाळ, वसीम शेख ,जुबेर खान , रवि वाघ,गोलू जावळ वैभव खडसे उपस्थित होते.
अकोला मानिक टॉकीज चौक मोठ्या गणपतिजवळ वंचित बहुजन आघाडी अकोला महानगर पश्चिम अध्यक्ष कलीम खान पठान, महेंद्र भाऊ डोंगरे, युवा नेता अनवर शेरा, महासचिव मिलिंद वाकोड़े, अमोल वाकोड़े प्रवक्ता, महासचिव अजय तायडे, उपाध्यक्ष रजा़ ईरानी, सचिव इरफान शेख, हैदर शाह, शहादत अली, सैयद शकील , यूनुस शाह, कासम शेख, जावेद पठान, सोहेल भाई, रिज़वान , आरिफ अहमद अजहर पठान, उमर , नाजीम लीडर, जुनेद मंजर साहब, राजा पठान, आरिफ मामू, ऍड. अजहर अजी़जी, साबिर मौलाना, फैयाज ठेकेदार, समीर पठान, अशफाक भाई, एजाज़ खान, फिरोज़ शाह, इमरान भाई, वसीम पठान, शेख नईम हाजी साहब, शेख महबूब, शोएब कुरैशी, आज़म शेख ह्या पदाधिकारी कार्यकर्ता यांनी आंदोलन केले.
माधुरी कॉल्डड्रिंक समोर युवक आघाडीच्यावतीने जय रामा तायडे महानगर अध्यक्ष युवक,अमित मोरे, महासचिव युवक, किरण सिरसाट,अश्विन शिरसाट, मंगेश इंगळे, प्रशांत वरघट,सुमित तेलगोटे,शुभम खंडारे,अक्षय शेंगोकर,स्वप्नील बागडे,साहिल आठवले,धम्मा तायडे,शुभम हिवराळे,गौरव पातूरडे,अक्षय गाते,पावन सावळे,आशिष पारिषे उपस्थित होते.
वाशिम बायपास,अकोला येथील आंदोलनामध्ये
जि प अध्यक्षा प्रतिभा भोजने, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा प्रभा शिरसाट, महासचिव शोभा शेळके, सभापती म बा मनिषा बोर्डे, जि.प. सदस्या निता गवई, प्रतिभा अवचार, योगीता वानखडे, पं. स.गटनेता मंगला शिरसाट, उमा अंभोरे, सुरेखा सावदेकर , सुनिता धुरंधर, गीता गवई, मंदा वाकोडे, शिला गोपनारायण,मंदा आठवले, माया तायडे, सरला बाभुळकर, सुलोचना सोनोने,प्रभा गवई, लता टोबरे,शिला मोहोळ,वंदना घुगे, बेबी दांडगे, गंगाबाई शिरसाट, मीरा ईंगळे, अर्चना कांबळे हे कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते. जुने शहर डाबकी रोड कानाल रोड येथे वंचीत बहुजन आघाडीच्या पश्चिम महासचिव प्रा. मंतोष मोहोळ, मिलिंद तेलगोटे,सोमेश डिगे ,धीरज खंडारे, हिम्मत जाधव रेखा गवई, पुष्पा वानखेडे, राजकण्या वानखेडे ,वर्षा हिवराळे,प्रतिभा वानखेडे,मानकर सोबत असंख्य कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला .
सम्यकने केले टाॅवर चौकातील रस्त्यावरील खड्ड्यात कमळ लावुन आंदोलन केले.
सम्यक विद्यार्थी आंदोलन अकोला जिल्हा महासचिव प्रतुल विरघट, धिरज इंगळे, संघटक आकाश गवई, प्रसिद्धी प्रमुख पवन गवई, प्रवक्ता विशाल नंदागवळी,उपाध्यक्ष आदित्य बावनगडे, सुमित भांबोरे, अॅड.भुषण घनबहादुर, राहुल इंगळे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
अकोट फैल येथे आंदोलन करताना वंचित बहुजन महिला आघाडी प्रदेश महासचिव अरून्धती शिरसाट, महानगर अध्यक्ष वंदना वासनिक, बुध्दरत्न इंगोले, म न पा घटनेच्या धनश्री देव, किरण बोराखडे, सुवर्णा जाधव, प्रिती भगत, मंतोष मोहोड, विश्वास बोराडे, श्रावण ठोसर, श्रीकांत गायकवाड, कीशोर मानवटकर,वंचितच्या आंदोलनाचा धसका घेत प्रशासन लागले कामाला.
वंचितच्यावतीने आज रस्त्यावर पडलेले खड्डे व त्यात साचलेल्या पाण्यात सत्ताधारी भाजप विरोधात केलेल्या आंदोलन यामुळे लॉकडाउन असतांना केलेल्या आंदोलना मूळे प्रशासन ताळ्यावर आले असून आंदोलन होताच तासाभरात माणेक टॉकीज टिळक रोड येथे खड्ड्यात मुरूम टाकण्यास सुरुवात झाली आहे.

Previous articleगडचिरोली जिल्ह्यात कोविड-19 चे १३ रुग्णांना डिस्चार्ज तर नविन बाधीत ६ रुग्ण
Next articleमहात्मा फुले कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागात शेतकऱ्यांना शेती संदर्भात जनजागृतीचा कार्यक्रम आयोजित केला होता.