अनोखी घटना:मुलीने केला बापावर प्राणघातक हल्ला

158

 

प्रतिनिधी-ऋग्वेद येवले

लाखनी-लाखनी पोलिस स्टेशन हद्दीत येत असलेल्या चिचगाव/सराटी या गावात 55 वर्षीय बापावर पोटच्या मुलीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली.
वृत्त असे की, जखमी मनोज महादेव रामटेके वय ( 55) वर्ष व आरोपी मोना मनोज रामटेके वय( 25) वर्ष यांच्यांत काही कारणास्तव वाद निर्माण झाला.वादानंतर काही वेळाने मनोज जेवन करुन झोपले असताना आरोपीने खान्याचा ( सोयाबीन)तेल गरम करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.पण सुदैवाने वेळीच जिल्हा रुग्णालय भंडारा येथे उपचार झाल्याने जखमी मनोज बचावला.
मनोजच्या तक्रारी वरुन पोलिस स्टेशन लाखनी येथे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतरआरोपी मोना ही फरार असल्याचे समजले.नंतर मोबाईल लोकेशन च्या आधारे तपास केली असता पंचशील वार्ड साकोली येथे दडुन असल्याचे निदर्शनास आले . लगेच तिथं जाऊन आरोपीला ताब्यात घेण्यात आले.
घटनेचा तपास लाखनी पोलिस करीत आहेत.