नांदेडच्या मनसे शहराध्यक्षाने केली आत्महत्या

108

 

जिल्हा प्रतिनिधी, नांदेड
राजेश बालाजीराव नाईक
दखल न्यूज // दखल न्यूज भारत

नांदेड:- नांदेडचे शहराध्यक्ष सुनील इरावार यांनी आत्महत्या करण्यापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह कुटुंबियांची माफी मागणारी सुसाईड नोटही लिहून ठेवली आहे. विशेष म्हणजे, मागच्या वर्षी याच महिन्यात नांदेडच्या जिल्हाध्यक्षानेही आत्महत्या केली होती.

जिल्ह्यातील किनवटमध्ये राहणाऱ्या सुनील इरावार यांनी काल (शनिवार 15 ऑगस्ट) रात्री आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने आपण आत्महत्या करत असल्याचे त्यांनी लिहिले आहे. या नोटमध्ये त्यांनी लिहीले, ‘राजसाहेब मला माफ करा. आमच्या येथे पैसा आणि जात या गोष्टीवर राजकारण केलं जातं आणि माझ्याकडे या दोन्ही नाहीत. यापुढे राजकारण करण्यासाठी माझी आर्थिक परिस्थिती कमजोर असल्यामुळे मी माझे यापुढील जीवन माझ्या मनाने संपवत आहे. तरी माझ्यामुळे कोणालाच त्रास देऊ नका. आई मला माफ कर – तुझाच सुनील, जय महाराष्ट्र, जय राजसाहेब, जय मनसे.’