Home नागपूर कांग्रेस चे माजी नगरसेवक देवा ऊसरे यांची नागपुरात आज सकाळी दिवसाढवळ्या हत्या!...

कांग्रेस चे माजी नगरसेवक देवा ऊसरे यांची नागपुरात आज सकाळी दिवसाढवळ्या हत्या! गड्डीगोदाम परिसरात वातावरण चिघळले; शेकडो नागरिकांची देवा ऊसरे यांच्या घरी गर्दी

157

 

सुनील उत्तमराव साळवे
कार्यकारी संपादक, दखल न्यूज भारत नागपुर*l

गड्डीगोदाम – सदर/ नागपुर :१६ आँगस्ट २०२०
नागपुर शहरातील सदर पोलीस स्टेशन अंतर्गत गड्डीगोदाम परिसरातील भारत टाँकिज जवळ असलेल्या एका चहा टपरीवर कांग्रेसचे माजी नगरसेवक देवा ऊसरे यांची भरदिवसा कुर्हाडीचे घाव घालुन हत्या करण्यात आली.
दोनवेळा कांग्रेसच्या तिकिटावर निवडुन आलेल्या देवा ऊसरे हे आमदार विकास ठाकरे गटाचे होते. आपसी वादातून दोन अज्ञात आरोपींनी मागुन येऊन देवा ऊसरे यांचेवर कुर्‍हाडी ने हल्ला केल्याची माहिती असुन रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या देवा उसरे यांना सदर पोलिसांनी मेयो रुग्णालयात दाखल केले असता त्यांना डॉक्टरांनी म्रृत घोषित केले.
आज संध्याकाळी सहा वाजता चे सुमारास त्यांचे प्रेत त्यांच्या गड्डीगोदाम येथील निवासस्थानी अंबुलंस ने आणण्यात आले. त्यावेळी या परिसरातील शेकडो नागरिक व हितचिंतक यांनी एकच गर्दी केली होती. या परिसरात तडवणालसद्रृष परिस्थिती असुन मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ऐन पोळा व पाडव्या पुर्वी हे रक्तरंजित घटना घडल्याने राजकीय वर्तुळात भीतीचे वातावरण पसरले आहे. सुरक्षा व्यवस्था चे तीन तेरा वाजलेले दिसत आहे. कोरोना पार्श्वभूमीवर गुंडागर्दी च्या व गुन्ह्यात कमालीची वाढ झालेली दिसत आहे.
एकीकडे २ दिवसांपुर्वी ग्रृहमंत्री अनिलबाबु देशमुख यांनी नागपुरातील गुंडागर्दी व दहशत संपली असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले त्याच्या दोन दिवसातच कांग्रेसचे माजी नगरसेवक देवा ऊसरे यांची झालेली हत्या आता पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण करीत आहे.
दुसरीकडे कांग्रेस चे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी याप्रकरणी अतितात्काळ अटक करुन गुन्हेगारांना कठोर शिक्षा देण्याची मागणी ग्रृहमंत्री अनिलबाबु देशमुख यांना केली आहे. नागपुर शहर कांग्रेस कमेटी तसेच, आ. विकास ठाकरे, तसेच कांग्रेस चे युवा नेता विशाल मुत्तेमवार यांनी देवा ऊसरे यांना श्रद्धांजली अर्पण करुन ऊसरे कुटुंबियांना यातुन सावरण्यासाठी प्रार्थना केली आहे. रात्री उशिरापर्यंत जरिपटका कब्रिस्तान येथे देवा ऊसरे यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
देवा ऊसरे यांचेवर हल्ला करणाऱ्यांचा अजुन छडा लागला नसुन सदर पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

Previous articleयवतमाळ जिल्ह्यात पोळा सणावर कोरोनाचे सावट यंदाचा पोळा घरीच
Next articleनांदेडच्या मनसे शहराध्यक्षाने केली आत्महत्या