गेल्या 24 तासात जिल्हयात एकूण 98 रुग्ण पॉझिटिव्ह

106

 

प्रतिनिधी / निलेश आखाडे.

रत्नागिरी : प्रयोगशाळांमध्ये सरासरी दैनिक तपासणी च्या गतीत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आल्याची नोंद राज्य पातळीवर घेण्यात आली आहे गेल्या तीस दिवसात सरासरी 179 तपासणी सरासरी असलेल्या रत्नागिरी प्रयोगशाळेत गेल्या आठवडाभरात प्रति दिन 249 नमुन्यांची तपासणी झाली आहे. यासोबतचअँटीजेन तपासण्यांचे प्रमाणदेखील वाढवून आले आहे. गेल्या चोवीस तासात प्रयोग शाळेतून केवळ सात रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला असून अँटीजेन चाचण्यांमध्ये इतर रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे निष्कर्ष आले आहेत यामुळे रुग्णां लवकर निदान करण्यास जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गती प्राप्त झाली आहे. गेल्या 24 तासात जिल्हयात अन्टीजेन चाचणीत 91 तर आरटीपीसीआर चाचणीत 7 असे एकूण 98 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. यामुळे जिल्हयातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 2845 इतकी झाली.
आज जिल्हा शासकीय रुग्णालय येथून 3, तसेच 25 रुग्ण होम ऑयसोलेशनमध्ये उपचार घेत असताना बरे झाले व घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांचा संख्या आता 1816 झाली आहे.
*पॉझिटिव्ह खालीलप्रमाणे दाखल*
*आरटीपीसीआर मधील*
रत्नागिरी – 7
*ॲन्टीजेन टेस्ट मधील*
रत्नागिरी – 29
कळबणी – 4
कामथे – 45
घरडा रुग्णालय – 13
*एकूण 91 + 7 = 98 पॉझिटिव्ह रुग्ण*
आज शांतीनगर, रत्नागिरी येथील 15 ऑगस्ट रोजी सकाळी ऍ़न्टीजेन टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आलेल्या 52 वर्षीय कोरोना रुग्णाचा रात्री 12.45 वाजता मृत्यु झाला. त्यामुळे एकूण मृत्यु संख्या आता 102 झाली आहे.
*सायंकाळची स्थिती खालीलप्रमाणे*
एकूण पॉझिटिव्ह – 2845
बरे झालेले – 1816
मृत्यू – 102
ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह – 927

*संस्थात्मक विलगीकरण*
संस्थात्मक विलगीकरणात रुग्णालयांची स्थिती पुढीलप्रमाणे आहे. शासकीय सामान्य रुग्णालय, रत्नागिरी – 43, समाजकल्याण, रत्नागिरी – 6, उपजिल्हा रुग्णालय, कामथे -46, उपजिल्हा रुग्णालय, कळबणी -27, कोव्हीड केअर सेंटर घरडा -5, कोव्हीड केअर सेंटर पेढांबे – 7, कोव्हीड केअर सेंटर केकेव्ही, दापोली – 20, गुहागर – 5, पाचल -1असे एकूण 160 संशयित कोरोना रुग्ण दाखल आहेत.

*होम क्वॉरंटाईन*
मुंबईसह एम.एम.आर.क्षेत्र तसेच इतर जिल्हयातून आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाईन केले जाते. आज अखेर होम क्वारंटाईन खाली असणांरांची संख्या 50 हजार 904 इतकी आहे.

*18 हजार पेक्षा जास्त निगेटिव्ह*
जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 22 हजार 045 नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 21 हजार 833 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 2845 अहवाल पॉजिटीव्ह आले असून 18 हजार 976अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अजून 212 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. 212 रत्नागिरी येथील प्रयोगशाळेमध्ये प्रलंबित आहेत.
होम क्वारंटाईन म्हणून शिक्का मारलेला कोणीही इसम बाहेर फिरताना दिसल्यास त्याबाबतची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षात ७०५७२२२२३३ हा व्हॉटसॲप क्रमांक, नियंत्रण कक्षाचे दूरध्वनी क्रमांक ०२३५२-२२२२३३ व २२६२४८, आपल्या नजीकच्या आरोग्य केंद्रात, पोलीस यंत्रणा अथवा ग्रामपातळीवर ग्राम कृति दलाना देण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

*दखल न्यूज भारत*