मार्कंडा देवस्थानच्या जिर्णोद्धारासाठी उर्वरीत निधी तातडीने घा. खा.अशोक नेते

101

अशोक खंडारे उपसंपादक
विदर्भाची काशी म्हणून प्रसीद्ध असलेल्या चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा देवस्थानच्या जिर्णोद्धाराचे बांधकाम गेल्या तिन वर्षांपासून सुरू आहे मात्र निधी उपलब्ध नसल्याने बांधकाम अपूर्ण आहे. याची दखल घेऊन खा.अशोक नेते यांनी पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन उर्वरीत निधी उपलब्ध करून देण्यासाठी सुचना दिल्या.
खा.अशोक नेते यांनी भ्रमणध्वनी व्दारे पुरातत्व विभाग मुंबई च्या क्षेत्रीय संचालीका व दिल्ली चे महानिर्देशक यांच्याशी संपर्क साधून मार्कंडा देवस्थानचे काम लवकर पूर्ण होण्यासाठी उर्वरीत निधी तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
जिल्हाधिकारी कार्यालय च्या सभागृहात आयोजित बैठकीत खा.नेते, भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे प्रकाश गेडाम, रेखाताई डोळस, जिल्हाधिकारी दिपक सिंगला, पुरातत्व विभागाचे अधिकारी प्रशांत शिंदे,मार्कंडा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गजानन भांडेकर, सचिव
मृत्युंजय गायकवाड उपस्थित होते.